उस्मानाबाद - राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणात कपात करण्यात आलेल्या अध्यादेशाबाबत आज (3 आॅगस्ट) ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्यावतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात या संबंधीचे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले होते. परंतु, ते मंजूर झालेले नाही. असे असताना देखील या शासनाने ओबीसी आरक्षणाला कात्री लावण्याचा अध्यादेश काढून संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. तरी हा अध्यादेश रद्द करून अपेक्षित ओबीसींना आश्वस्त करावे, अन्यथा आम्ही जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने लढा देऊन होणाऱ्या परिणामाला पुर्णत: शासन जबाबदार राहिल, असे कृती समितीच्यावतीने करण्यात आले.
या आंदोलनात पांडुरंग लाटे, महादेव माळी, रवि कोरे आळणीकर, लक्ष्मण माने, भारत डोलारे, युवराज नळे, मुकेश नायगावकर, धनंजय शिंगाडे यांच्यासह ओबीसी वर्गातील बांधव यावेळी उपस्थित होते.