तुळजापूर : लग्नाचा प्रस्ताव एम एमआयएमने दिला आहे, तो स्विकारावा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. हे सांगताना त्यांची जीभ घसरली आणि महाविकास आघाडीबद्दल बोलताना त्यांनी अश्लील भाषेचा वापर केला. याच बरोबर 2024 मध्ये भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा दावा देखील केला आहे. मात्र त्यांच्या अश्लील वक्तव्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये एमआयएमला सामील करून घ्यावे, असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकारण चांगले तापलेले पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र कुठंतरी या मुद्द्यावरून विवादित वक्तव्य करून भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा या विषयाला वाचा फोडली आहे.
हेही वाचा : Sanjay Raut Criticized : 'ते कधीपासून हिंदू झाले हे तपासावे लागेल; संजय राऊतांचा भाजप-मनसेवर निशाणा