उस्मानाबाद - शहरात जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापासून ते काळा मारुती मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती पाणीपुरवठ्याची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या पाईप लाईनसोबत ओ.एफ.सी. केबल टाकण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानापासून ते काळा मारुती मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरती पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूला मोठी चारी खोदून त्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनसह ओ.एफ.सी. केबलही टाकण्यात येत आहे.
या खड्ड्याचे खोदकाम नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. त्यात खासगी कंपनीची केबल टाकण्याची परवानगी कोणी दिली? अशी चर्चा सध्या शहरात आहे. ओ.एफ.सी. केबल वायर पाण्याच्या पाईपलाईन सोबत टाकले जात असेल तर याचा नागरिकांना धोका संभवतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे यांनी व्यक्त केले आहे.