उस्मानाबाद - कोरोना विषाणूमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे लहान-मोठे उद्योजक आपापल्या परीने मदत करत आहेत. यात साखर कारखानदारही पुढे सरसावले आहेत. नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 33 लाख 11 हजार 771 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला.
राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आर्थिक मदत केल्यास साखर उद्योगातून जवळपास 1OO कोटीची आर्थिक मदत जमा होऊ शकते, असे ते म्हणाले. सामाजिक जाणिवेतून आम्ही राज्यावर आलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी हे पैसे जमा करत आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही ठोंबरे यांनी केले.