ETV Bharat / state

शरद पवारांचा उस्मानाबाद दौरा : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांसह घेणार पंतप्रधानांची भेट - osmanabad breaking news

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज (दि.18 ऑक्टोबर) शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत.

पाहणी करताना शरद पवार
पाहणी करताना शरद पवार
author img

By

Published : Oct 18, 2020, 10:11 AM IST

Updated : Oct 19, 2020, 2:55 PM IST

उस्मानाबाद - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज (दि.18 ऑक्टोबर) शरद पवार यांनी जिल्हाचा दौरा आयोजित केला आहे. त्यासाठी शरद पवार हे सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील हेलिपॅडवर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा गराडा प्रचंड प्रमाणात होता. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जाते आहे. याच नियमावर बोट ठेऊन पवारांनी कार्यकर्त्यांना लांब लांब थांबण्यासाठी हात हातवारे करून सांगत होते. मात्र, हा नियम शरद पवार यांच्या समोरच तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पायदळी तुडवत होते. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगू लागले. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने पवारांनी दिलेला सल्ला कार्यकर्त्यांनी चक्क पायदळी तुडवला.

ईटीव्हीचे आभार मानताना शेतकरी

दोन दिवसांपूर्वी ईटीव्ही भारतने 'उस्मानाबादेत इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे आली मोठी आपत्ती' ही बातमी प्रकाशीत केली होती. या बातमीची दखल घेत शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील देशमुख या शेतकऱ्याच्या खराब झालेल्या सोयाबीनची पाहणी केली. यावेळी शेतकरी देशमुख यांनी ईटीव्ही भारतचे आभार मानले.

शरद पवारांचा उस्मानाबाद दौरा : कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा आदेश पायदळी

दरम्यान, शरद पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यात चोरट्यांचा सुळसुळाट होता. उमरगा लोहाराचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असताना चक्क आमदारांचीच चेन चोरीला गेल्याने चर्चा रंगली आहे.

नुकसानग्रस्त शेत व पिकांची पाहणी केल्यानंतर हे स्वरुप पाहता राज्य सरकार या परिस्थितिला तोंड देईल, असे वाटत नसल्याचेही पवार म्हणाले.

  • येत्या दहा दिवसांत खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून केंद्रीय मदतीसाठी त्यांच्याकडे आग्रह करू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
  • शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, याला काही मर्यादा असल्यामुळे केंद्राची मदत घेणार असल्याचे पवार म्हणाले.
  • सास्तुरे येथील शेतकऱ्यांना भेटले शरद पवार
  • शेतकऱ्याने मानले 'ईटीव्ही भारत'चे आभार
  • शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन पवार यांना दाखवले
  • लोहारा शहरातील चौकात शरद पवारांनी शेतकऱ्यांची घेतली भेट
  • काक्रंबा येथे ओढ्याची पाहणी केल्यानंतर शरद पवार लोहारा येथे शेतकऱ्यांच्या भेटीला निघाले
  • सकाळी सव्वानऊ वाजता तुळजापूर येथील हेलीपॅडवर दाखल

हेही वाचा - तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना; पहिल्यांदाच उत्सव भक्तांविना

Last Updated : Oct 19, 2020, 2:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.