ETV Bharat / state

'राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही संमेलनाच्या मंचावर स्थान नको' - सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

साहित्य संमलेनाचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. मात्र, ठरल्याप्रमाणे त्यांना मंचावर बसवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्यांना देखील मंचावर स्थान देऊ नये, अशी मागणी साहित्यिकांनी केली आहे.

sahitya sammelan
साहित्यकार
author img

By

Published : Jan 11, 2020, 2:14 PM IST

उस्मानाबाद - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकारण्यांना स्थान असणार नाही, असे ठरले होते. त्यानुसार सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख कार्यक्रमाला उपस्थित असताना देखील त्यांना मंचावर बसवले नाही. मात्र, या राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील मंचावर बसवू नये, अशी मागणी साहित्यकार करीत आहेत.

राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही संमेलनाच्या मंचावर स्थान नको - साहित्यकार

मराठी साहित्य संमेलन म्हटले की, वाद आणि प्रतिवाद आलेच. मात्र, हे वादाचे समीकरण अद्यापही कायम आहे. साहित्य संमलेनामध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाने सुरू झालेला वाद हा नुकताच शांत झाला. त्यानंतर राजकारण्यांना मंचावर स्थान देऊ नका, अशी मागणी जोर धरत होती. त्यानुसार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. मात्र, त्यांना स्टेजवर बोलावण्यात आले नाही. याबाबतीत साहित्यिकांमध्ये समाधान असले तरी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते हे सभामंडपामध्ये कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित होते. त्यामुळे या मंचावर फक्त साहित्यिक असायला हवे, अशी मागणी साहित्यकार करीत आहेत. त्यामुळे या साहित्य संमेलनामध्ये हा नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का? - साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन

Intro:राजकारण प्रमाणेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही साहित्यिकांच्या स्टेजवरती प्रवेश बंदी असायला हवी

उस्मानाबाद- मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद आणि प्रतिवाद आलेच वादाचे हे समीकरणच अजून ही कायम बनले आहे 93 व्या साहित्य संमेलनात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाने सुरू झालेला वाद आता कुठे शांत झाला होता त्याच बरोबर राजकारण्यांना साहित्यिकांच्या स्टेजवरती प्रवेश नसायला हवी अशी मागणी गेली कित्येक दिवस लागून राहिली त्या अनुषंगाने कालच्या झालेल्या उद्घाटनाचा समारंभावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते मात्र त्यांना साहित्यिकांच्या स्टेजवरती बोलवण्यात आलं नाही याबाबतीत साहित्यिकांमध्ये समाधान असलं तरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते कोलते हे सभामंडपाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरती उपस्थित होते त्यामुळे हे स्टेज फक्त साहित्यिकांचे असायला हवे इथे जसा राजकारण्यांना स्थान नाही त्याच पद्धतीने प्रशासनातील अधिकाऱ्यांना ही या स्टेजवरती स्थान असायला हवे अशी मागणी या साहित्य कारमधून होत आहे त्यामुळे या साहित्य संमेलनातील हा नवीन वाद उद्भवू शकतो या संदर्भात या साहित्यिकांनी ईटीव्ही भारतशी प्रतिक्रिया दिली आहे...

Body:यात चौपाल आहे

Conclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.