उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील, परंडा तालुक्यातील, अनाळा येथील ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांनी जिद्द, चिकाटी आणी संघर्षाच्या जोरावर ७० लाख रुपयांचा बंगला बांधून, आलिशान बंगल्यावर (Life Changing Tractor Place on the Roof) ट्रॅक्टर ठेवला आहे. Success Story of Tractor Mechanic
मूळ परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील असलेले भिलारे कुटुंबीय अनाळा येथे स्थायिक झाले. अशोक भिलारे यांचे वडील सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतीत काम करायचे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे आर्थिक उपजीविकेसाठी अशोक भिलारे यांनी ट्रॅक्टर दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनाळा येथे छोटेखानी ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज सुरु केले. हळूहळू व्यवसायला मोठी भरभराट लाभली, बंडेवार ट्रॅक्टर उस्मानाबाद यांनी विक्रीचे आणि दुरुस्तीचे काम भिलारे यांच्याकडे दिले,त्यामुळे आर्थिक उन्नतीत आणखी प्रगती झाली.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत अशोक भिलारे यांनी सात एकर जमीन विकत घेतली. लाखोंचा बंगला बांधला, इतकंच नाही तर क्रेनच्या सहाय्याने, घरावर ट्रॅक्टर ठेवला, अनाळा -परंडा या मुख्य रस्त्याने जाणाऱ्या अनेकांना बंगल्यावरील ट्रॅक्टर भिलारे यांची संघर्षमय यशोगाथा जणु काही अभीमानाने सांगत आहे.
दररोज सकाळी पंधरा मिनिटे ट्रक्टरचा प्रवास करुन, अशोक भिलारे हे ट्रॅक्टरचा आनंद घेतात. आज त्यांनी
आपल्या गॅरेज मध्ये आठ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होता येतं, हे याचंच एक हे उदाहरण आहे. Success Story of Tractor Mechanic