ETV Bharat / state

वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द - Bank License revoked Osmanabad

वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे. याबाबत सोमवारी आदेश काढण्यात आला असून, 11 जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली.

वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

author img

By

Published : Jan 12, 2021, 3:30 PM IST

उस्मानाबाद- वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा बँकिंग व्यवसाय करण्याचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे. याबाबत सोमवारी आदेश काढण्यात आला असून, 11 जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांनाही बँकेला वळण लावण्याचे आदेश देण्यात आले असून, बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती केली आहे.

वसंत दादा नागरी सहकारी बँक ही आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे तसेच नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरली असून, सध्याची बँकेची आर्थिक स्थिती पाहता बँक आपल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्यास असमर्थ ठरली आहे. तसेच जनतेच्या हिताचे आणि बँकेच्या व्यवहारांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द

यापूर्वी 2017 मध्ये झाली होती कारवाई

वसंतदादा बँकेवर 2017 मध्ये आरबीआयने सर्वप्रथम कारवाई करून, नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली होती. तसेच हजारो ठेवीदारांना केवळ 1 हजार रुपयाप्रमाणे ठेवी परत केल्या जात होत्या. तसेच बँकेला प्रत्येक वेळी 6 महिन्याच्या मुदतीवर वसुली करून, बँकेचा कारभार स्वीकारण्यास संधी दिली होती. परंतु व्यवहारात सुधारणा न झाल्याने अखेर आरबीआयने सोमवारी ही कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.