ETV Bharat / state

२५ वर्षांपासून टँकरचे पाणी; एक दिवसआड १२ हांडे पाण्यासाठी ग्रामस्थ मोजतात महिन्याला १०० रुपये - उस्मानाबाद

टँकरच्या पाण्यासाठी महिन्याकाठी १०० रुपये मोजावे लागतात. त्यानंतर एका दिवसाआड १२ हांडे पाणी मिळते.

कोळेवाडी ग्रामस्थ
author img

By

Published : May 13, 2019, 11:40 PM IST

उस्मानाबाद - शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेवाडीत १९९५ पासून टँकर सुरू आहेत. येथील वृद्धांपासून ते शाळकरी मुले १२ महिने टँकरच्या पाण्यासाठी रांगा लावत आहेत. गावातील रोज १२ हांडे पाणी मिळण्यासाठी महिन्याला १०० रुपये मोजत आहेत. त्यामुळे या गावचा पाणी प्रश्न कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

कोळेवाडी ग्रामस्थांची प्रतिक्रिया

गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया

१. गावातील प्रथमेश अकोसकर म्हणाला, त्याच्या लहानपणापासून तो टँकरचेच पाणी आणतो. गावात नळाला पाणी आलेले कधीच पाहिले नाही. पाण्यासाठी दररोज येथे रांगा लागतात आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरतो.

२. ७० वर्षांच्या आज्जी इंदूबाई अकोस्कर म्हणाल्या, पतीला आणि त्यांना दोघांना खांद्यावर पाणी आणावे लागते. येथे जवळपास कोठेच पाणी नाही. टँकरनेच पाणी आणावे लागते. आमच्या घराजवळच पुरातन कोरीव बांधकाम केलेली विहिर आहे. परंतु, ती कोरडीठाक पडली आहे. टँकरच्या पाण्यासाठी महिन्याकाठी १०० रुपये मोजावे लागतात. त्यानंतर एका दिवसाआड १२ घागरी पाणी मिळते.

३. विकास इंगळे म्हणतात, टँकर आल्यावर सगळी कामे बाजूला ठेवावे लागतात. या पाण्यासाठी आम्ही महिन्याला १०० रुपये देतो. तरीही येथे भांडणे होतात.

४.१५ वर्ष सरपंच पद भूषविलेले राऊत म्हणाले, आमच्या गावचा राष्ट्रीय पेय जल योजनेत समावेश करण्यात आला होता. मात्र, आमच्या गावात जीवन प्राधिकरण योजना राबविण्यात आल्यामुळे पेय जल योजना रद्द करण्यात आली. आणि जीवन प्राधिकरणची योजना १३ लाख रूपये लाईट बिल आल्यानंतर बंद पडली.

कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद

याचे feed मोजो वरती पाठवली आहे या नावाने

1995 पासून या गावाला आहे टँकर; महिन्याकाठी मोजावे लागतात 100 रुपये

जिल्ह्यातला पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे उस्मानाबाद पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेवाडी 1995 पासून टॅंकर सुरू आहे येथले म्हतारे-कोतारे  लहान शाळकरी मुलं 12 ही महिने पाण्यासाठी टँकरच्या समोर रांगा लावतात.या गावातील प्रथमेश अकोसकर सांगतो की त्याच्या लहानपणा पासून तो टँकरचेच पाणी आणतो त्याने या कोळेवाडीत नळाला पाणी आलेले कधीच पाहिले नाही पाण्यासाठी दररोज येथे रांगा लागतात आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरतो असे प्रथमेश सांगतो तर 70 वर्षांच्या आज्जी इंदूबाई अकोस्कर संगतात की त्यांना आणि त्यांच्या पतीला दोघांना खांद्यावर पाणी आणावे लागते येथे जवळपास कोठेच पाणी नाही टँकरचेच पाणी आणावे लागते आमच्या घराजवळच पुरातन कोरीव बांधकाम केलेली विहिर आहे परंतु ती कोरडी ठाक पडली आहे आणि या टँकरच्या पाण्यासाठी महिन्याकाठी 100 रुपये मोजावे लागतात आणि त्या नंतर एक दिवस आड 12 घागरी पाणी मिळते तर विकास इंगळे म्हणतात टँकर आले की सगळी कामे बाजूला ठेवावे लागतात या पाण्यासाठी आम्ही महिन्याला 100 रूपये देतोय आणि तरी येथे भांडणे होतात.सलग 15 वर्ष सरपंच पद भूषविलेले राऊत सांगतात की आमच्या गावचा राष्ट्रीय पेय जल योजनेत समावेश करण्यात आला होता मात्र आमच्या गावात जीवन प्राधिकरण योजना राबविण्यात आल्या मुळे पेय जल योजना रद्द करण्यात आली व जीवन प्राधिकरणची योजना 13 लाख रूपये लाईट बिल आल्या कारणाने तीही योजना बंद पडली
त्यामुळे या गावचा पाणी टंचाई कधी सुटेल हा प्रश्नच आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.