ETV Bharat / state

उस्मानाबादेत पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, कारण अस्पष्ट - osmanabad crime

ज्या खोलीत पतीने गळफास घेतला त्याच खोलीत पत्नी संगीताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
author img

By

Published : Jul 9, 2019, 10:43 AM IST

उस्मानाबाद - पत्नीचा खून करून पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लोहारा तालुक्यातील अचलेर येथे उघडकीस आली आहे. दत्तुसिंग राजेंद्र ठाकूर (वय ३५) आणि संगीता ठाकूर (वय ३२) असे मृत पती-पत्नींची नावे आहेत. दत्तूसिंग याने पत्नीचा खून कोणत्या कारणामुळे केला याबद्दल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

दत्तूसिंग ठाकूर पत्नी संगीता दोन मुली व एका मुलासह अचलेर गावातील झोपडपट्टी परिसरात राहत होता. एका जीपवर तो चालक म्हणून काम करत होता. दरम्यान, रविवारी रात्री पत्नी आणि मुले झोपेत असताना त्याने पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ज्या खोलीत दत्तूने गळफास घेतला त्याच खोलीत पत्नी संगीताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस तपास करत होते.

चिमुकल्यांना दुसऱ्या खोलीत कोंडले

घटनेपूर्वी दत्तूने झोपलेल्या दोन्ही मुली व मुलाच्या खोलीला बाहेरून कडी घातली. त्यामुळे झोपेत असलेल्या या चिमुकल्यांना काहीच कळले नाही. सकाळी उठल्यानंतर दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांनी हाका मारण्यास सुरुवात केली. कोणीच दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी आरडाओरड केला. त्यामुळे शेजारच्यांनी दरवाजा उघडला तेव्हा खुनाचा प्रकार समोर आला.

Intro:पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

रात्रीच्या वेळी पत्नीचा धारधार शस्त्राने खून करून त्यानंतर पतीनेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी लोहारा तालुक्यातील अचलेर येथे उघडकीस आली आहे.अचलेर येथील दत्तुसिंग राजेंद्र ठाकूर (३५) हा पत्नी संगीता (३२),दोन मुली व एका मुलासह गावातील झोपडपट्टी परिसरात रहात हाेता. तो एका जीपवर चालक म्हणून काम करून उपजिविका भागवत होता. दरम्यान, रविवारी (दि.७) रात्री दत्तुसिंग त्याची पत्नी संगीता व चिमुकले झोपी गेले. दरम्यान, रात्री उशिरा दत्तुसिंगने पत्नीचा खून करून स्वत:ही पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ज्या खोलीत दत्तुने गळफास घेतला त्याच खोलीत पत्नी संगीताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा असे चिमुकले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस अचलेर गावातच होते. दत्तूसिंग याने पत्नी संगीताचा खून कोणत्या कारणामुळे केला याबद्दल पोलिसांकडून चौकशी सुरू होती.

चिमुकल्यांना दुसऱ्या खोलीत कोंडले

घटनेपूर्वी दत्तुने झोपलेल्या दोन्ही मुली व मुलाच्या खोलीला बाहेरून कडी घातली. त्यामुळे झोपेत असलेल्या या चिमुकल्यांना काहीच कळले नाही. सकाळी उठल्यानंतर दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांनी हाका मारण्यास सुरुवात केली. कोणीच दरवाजा उघडत नसल्याने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारच्यांनी दरवाजा उघडून तसेच दुसऱ्या खोलीत पाहिल्यानंतर घडला प्रकार समोर आला.Body:यात दोघांचे फोटो आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.