उस्मानाबाद- गुरुवारी महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यात उस्मानाबादमध्ये चार विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राणाजगजितसिंह पाटील हे विजयी झाले. विजयानंतर त्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत पैशांची उधळण चालू होती. हा प्रकाराचे चित्रीकरण पत्रकार आयुब शेख हे करत होते. त्यावेळी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.
हेही वाचा - सक्षम प्रतिस्पर्धी नसल्याने नवी मुंबईत महायुतीच्या पारड्यात विजय
झाले असे की, या विजय रॅलीत सभापती विजय गंगणे हे शंभर शंभर रुपयांच्या नोटांची उधळपट्टी करत होते. त्यानंतर विजय गंगणे हा पैसे उधळत असल्याचे पाहिल्यानंतर पत्रकार आयुब शेख यांनी याचे चित्रीकरण सुरू केले. यानंतर अचानक विजय गंगणेंच्या कार्यकर्त्यांने आयुब शेख यांच्यावर हल्ला केला व मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सुरू झालेला गोंधळ थांबवण्यासाठी पोलीस आले मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली. त्यामुळे या प्रकारानंतर भाजपच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.