ETV Bharat / state

कोरोना विषाणू संदर्भात तुळजाभवानी मंदिर प्रशासन उदासीन - कोरोना जिषाणू बद्दल बातमी

कोरोना विषाणूचा बिमोड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व जण कामाल लागले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तुळजाभवानी मंदिरात या बद्दल कोणतीही काळजी घेतलेली नाही.

here-is-no-arrangement-regarding-corona-virus-in-tulja-bhavani-temple
कोरोना जिषाणू संदर्भात तुळजाभवानी मंदिर प्रशासन उदासीन
author img

By

Published : Mar 6, 2020, 8:01 PM IST

उस्मानाबाद - जगभरात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. या आजाराचा बिमोड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व जण कामाला लागले आहेत. मात्र, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर प्रशासन या आजाराचा फैलाव होऊ नये, याचा बंदोबस्त करण्यासाठी उदासीन असल्याचा प्रकार समोर येत आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रत्येक दोन 2 तासानंतर स्वच्छता करण्याचे आदेश देऊन मंदिर प्रशासन निवांत झाले आहे. मंदिर परिसरात आजाराच्या जनजागृतीसाठीचे माहिती फलक देखील लावलेले नाही आहेत. जे मास्क घालायचे आहेत ते देखील कुठल्याही कर्मचाऱ्याला दिले नाहीत. याठिकाणी कुठलीही वैद्यकीय सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा - उस्मानाबादेत द्राक्षबागा उध्वस्त करणारी टोळी सक्रिय; शेतकरी चिंतेत

राज्य शासनाने या आजाराचा बिमोड व्हावा, यासाठी सगळ्या उपाययोजना करा असे आदेश दिले आहेत. मात्र, मंदिर प्रशासन सुस्त असल्याने भाविक नाराज झाले असून याबाबत भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातूनच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून देवीच्या दर्शनासाठी भाविक तुळजापूरमध्ये येत असतात. त्यामुळे या बाबत लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंदिर संस्थानकडून या बाबी करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात येत आहे.

कोरोना जिषाणू संदर्भात तुळजाभवानी मंदिर प्रशासन उदासीन

हेही वाचा - सावकारी पाश...! त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.