उस्मानाबाद - जिल्ह्यातील काही भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून उष्णतेची लाट ओसरून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून शेतकरी पेरणीसाठी पावसाचीच वाट पाहत होता.
रब्बी हंगाम संपण्याच्या दरम्यान राज्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यामळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून सावरत शेतकऱ्याने खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी केली आहे. त्यामुळे आज मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणत फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.