ETV Bharat / state

निसर्गाचा लहरीपणा.. कोल्हापूरच्या आंबेवाडी-चिखलीत महापूर, तर उस्मानाबादच्या आंबेवाडी व चिखलीत पाणीटंचाई - पाणीटंचाई

कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखलीत महापूर आला आहे. तर, उस्मानाबाद मधील आंबेवाडी आणि चिखली ही गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे एकीकडे पाणीच पाणी तर दुसरीकडे पाणीच नाही अशी विसंगत परिस्थिती आहे.

उस्मानाबादच्या आंबेवाडी आणि चिखली पाणीटंचाई
author img

By

Published : Aug 12, 2019, 5:07 PM IST

उस्मानाबाद- कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखलीत महापूर आला आहे. तर, उस्मानाबाद मधील आंबेवाडी आणि चिखली ही गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे एकीकडे पाणीच पाणी तर दुसरीकडे पाणीच नाही अशी विसंगत परिस्थिती आहे.

उस्मानाबादच्या आंबेवाडी आणि चिखली पाणीटंचाई

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूराने अक्षरश: थैमान घातले आहे. या दोन जिल्ह्यांना पूराचा मोठ्या प्रमणात फटका बसला आहे. कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांना महापूराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या दोन्ही गावांत दहा ते बारा फुटांपर्यंत पाणीपातळी वाढली होती. यामुळे पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते. वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या गावांना या पुराचा फटका बसला. मात्र, यापेक्षा वेगळी स्थिती उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांची आहे. उस्मानाबाद पासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन गावात पावसाळा सुरू झाला तरी अद्यापही पाणीटंचाई आहे.

सध्या जिल्हा परिषदेमार्फत बोअरचे अधिग्रहण करून या गावातील लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरीही या गावातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या अधिग्रहण केलेल्या बोअरलाही कमी प्रमाणात पाणी येत आहे. बोअरच्या पाण्याचा प्रवाह कमी जास्त होत आहे. अधिग्रहण केलेल्या या बोअरचे पाणी विहिरीत सोडले जाते. त्यानंतर गावातील पाण्याच्या टाकीत हे पाणी सोडले जाते. आजही इथे नळावर पाण्यासाठी भांडण ऐकायला आणि पाहायला मिळतात. दोन बोअरचे अधिग्रहण केले असले, तरीही या गावांमध्ये चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्याच्यामुळे काही वेळेस शेतातून पाणी आणण्याची वेळ येथील लोकांवर येते. कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखलीत महापूर, आणि उस्मानाबादच्या आंबेवाडी आणि चिखलीत पाणीटंचाई असा निसर्गाचा लहरीपणा पहायला मिळतोय.

Intro:निसर्गाचा लहरीपणा कोल्हापूर ते आंबेवाडी चिखलीत महापूर तर उस्मानाबादच्या आंबेवाडी आणि चिखली मध्ये पाणीटंचाई

उस्मानाबाद - कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांना महापूराचा सर्वात जास्त फटका बसला.भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. या दोन्ही गावात दहा ते बारा फुटांनी पाणीपातळी वाढली होती. लोकांच्या सुरक्षे खातर जवानांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना ही सुरक्षित स्थळी हलवले होते. वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना या पुराचा फटका बसला, मात्र यापेक्षा वेगळी स्थिती उस्मानाबाद जिल्ह्यातील आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांची आहे. उस्मानाबाद पासून अगदी पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन गावात अद्यापही पाणीटंचाई आहे. जिल्हा परिषदेमार्फत बोअरचे अधिग्रहण करून या गावातील लोकांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्याचे दोन महिने संपून गेले तरीही या गावातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या अधिग्रहण केलेल्या बोअरलाही म्हणावे तसे पाणी येत नाही. बोअरच्या पाण्याचा प्रवाह कमीजास्त होतो. अधिग्रहण केलेल्या या बोअरचे पाणी विहिरीत सोडले जाते, आणि त्यानंतर गावातील पाण्याच्या टाकीत हे पाणी सोडले जाते. आजही इथे नळावर पाण्यासाठी चे भांडण ऐकायला आणि पाहायला मिळतात दोन बोअर अधिग्रहण केले असले तरीही चार दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्याच्यामुळे काही वेळेस शेतातून पाणी आणण्याची वेळ येथील लोकांवरती येत आहे. कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखलीत महापूर तर उस्मानाबादच्या अंबेवाडी आणि चिखली या गावात पाणीटंचाई असा निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय

Body:यात पॅकेज एडिट करून पाठवले आहे
याला व्हिओ द्यायची आवश्यकता नाही

Conclusion:कैलास चौधरी
ईटीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.