ETV Bharat / state

सावधान... फेसबुक अकाऊंट हॅक करून होतेय पैशांची मागणी!

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी आता सोशल मीडियाचाही वापर केला जात असल्याचा प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. जिल्ह्यातील काही तरुणांना फेसबुकच्या माध्यमातून पैसे मागून फसवण्याचा प्रकार समोर येतो आहे.

Kalamb Police Station
कळंब पोलीस ठाणे
author img

By

Published : Jul 1, 2020, 5:28 PM IST

उस्मानाबाद - कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी आता सोशल मीडियाचाही वापर केला जात असल्याचा प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. जिल्ह्यातील काही तरुणांना फेसबुकच्या माध्यमातून पैसे मागून फसवण्याचा प्रकार समोर येतो आहे.

फेसबुक अकाऊंट हॅक करून होतेय पैशांची मागणी

हॅकर फेसबुकवरुन आपल्या फ्रेंडलिस्टमधील एकाचे अकाऊंट हॅक करतात व त्या अकाऊंटवरून अनेकांना आर्थिक मदतीने आवाहन करणारे मेसेज करतात. यामध्ये वैद्यकीय कारणांसाठी पैशाची अडचण असल्याचे सांगून मदतीचे आवाहन केले जात आहे. सोशल मिडियावर आपलाच ओळखीचा मित्र तुम्हाला मेसेज पाठवतो आहे, असे समजून अनेकजण पैसेही पाठवत आहेत. आर्थिक लुटीसाठी सायबर गुन्हेगारांनी आता नवीन-नवीन प्रकार शोधले असून फेसबुकवरील अनेकांना याचा फटका बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.