ETV Bharat / state

तेर येथे अभ्यासिकेच्या जागेवरून दोन गटात हाणामारी - अभ्यासिकेच्या जागेवरून हाणामारी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे दोन गटांत अभ्यासिकेच्या जागेवरून प्रचंड हाणामारी झाली आहे. यामध्ये अभ्यासिकेच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अभ्यासिकेची जागा स्थलांतरीत केल्यानंतर अभ्यासिकेचे साहित्य ठेवण्यावरून दोन गटांत सुरुवातीला शाब्दीक चकमक झाली. वातावरण इतके पेटले की, अभ्यासिकेच्या साहित्याची तोडफोड करायला काही जणांनी सुरुवात केली. यावरून त्यांच्यात मध्यस्थी करायला गेलेल्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी अद्याप गुन्हा झाला नाही.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Dec 21, 2021, 6:56 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील संत गोरोबाकाका यांच्या नगरीत म्हणजेच तेर येथे दोन गटांत अभ्यासिकेच्या जागेवरून प्रचंड हाणामारी झाली. आज ( दि. 21 ) सकाळी अभ्यासिकेचे सामान स्थलांतरित करण्यावरून सुरुवातीला शाब्दीक राडा झाला. त्यानंतर त्याचे हाणामारीत रुपांतर झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तेर येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 5 लाख रुपये खर्च करुन जुन्या ग्रामपंचायत कार्यालयातील एका हॉलमध्ये अभ्यासिका उभारण्यात आली होती. नंतरच्या काळात मासिक सभेत ही अभ्यासिका नरसिंह वेस चावडीत स्थलांतरीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीचा हॉल हा उमेदच्या महिलांना देऊन शनिवारी (दि. 18 ) या अभ्यासिकेतील साहित्य नवीन ग्राम पंचायतीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले होते.

अभ्यासिकेचे साहित्य ठेवण्यावरून राडा

जागा स्थलांतरीत केल्यानंतर अभ्यासिकेचे साहित्य ठेवण्यावरून दोन गटांत सुरुवातीला शाब्दीक चकमक झाली. वातावरण इतके पेटले की, अभ्यासिकेच्या साहित्याची तोडफोड करायला काही जणांनी सुरुवात केली. यावरून त्यांच्यात मध्यस्थी करायला गेलेल्यांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी अद्याप गुन्हा झाला नाही.

हे ही वाचा - Osmanabad Supari Killer Arrested : संपत्तीच्या वादातून जीवे मारण्यास सांगितले, सुपारी किलरला पोलिसांनी पिस्तुलासह पकडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.