उस्मानाबाद - तब्बल दोन महिन्याच्या उशिराने एनडीआरफचे केंद्रीय पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मागील दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते त्याची पाहणी करण्यासाठी हे पथक आज जिल्हा दौऱ्यावर होते.
पथके येतात जातात मदत मात्र भेटत नाही-
यावेळी शेतकऱ्यांनी या पथका समोर समस्यांचा पाढा वाचला. अनेक शेतकऱ्यांनी या पाहणी दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. पथके येतात जातात मदत मात्र भेटत नाही, अश्या शब्दात शेतकऱ्यांनी या पाहणी पथकावर नाराजी व्यक्त केली.
सहा गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी-
जिल्ह्यातील पाटोदा, केशेगावं, लोहारा, अशा सहा गावातील नुकसानग्रस्त भागाची या पथकाने पाहणी केली. मागील दोन महिन्यापूर्वी जिल्ह्याला अतिृष्टीने झोडपून काढले होते. यात सोयाबीन, उडीद, मूग, तूर, फळबागा, असे एकूण 2 लाख 59 हजार 255 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेल्या होत्या. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला.
शेतकऱ्यांच्या पदरी अगदीच तुटपुंजी मदत-
तत्पूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाने या अतिृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत मदतही जाहीर केली. मात्र झालेल्या नुकसानीच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पदरी अगदीच तुटपुंजी मदत पडली होती. त्यामुळे आता केंद्रीय पथकाच्या या पाहणी दौऱ्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- BREAKING : राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
हेही वाचा- 'कोरोना लसीकरणानंतरही जीवनावश्यक गरज राहणार 'मास्क'.. व्हॅक्सिनने केवळ 95 टक्के प्रतिकारशक्ती '