उस्मानाबाद : उस्मानाबादेत आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहेत. आज उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथील शेतकऱ्यांनी जलबैठे आंदोलन ( Farmers aggressive for their rights ) केले. काल काही शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलं तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
हक्काचे पिकविम्याचे पैसे : शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पिकविम्याचे पैसे मिळावेत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार कैलास पाटील गेली पाच दिवस आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनाचा पाठींबा वाढत आहे. जोपर्यंत आमदार कैलास दादा यांनी केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत पाण्याच्या बाहेर येणार नसल्याचा निर्धार पाडोळी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त करत आंदोलन सुरू केलं आहे पीकविमा, शेतकरी अनुदान आणि ओल्या दुष्काळाच्या मागणी साठी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण आता गावोगावी पसरत चालले आहे.
आंदोलनाची तीव्रता वाढली : दरम्यान शिवसैनिकांनी शेतक-यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलनाच्या समर्थनार्थ ( protest in front of collector office ) घोषणाबाजी केली. एकूणच प्रशासनाच्या हलगर्जीच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्तारोको करून जिल्हाधिकारी कार्यालयाला शिवसैनिकाकडून कुलूप लावण्यात आले.