ETV Bharat / state

कृषी दिन विशेष : अल्पशिक्षित असतानाही त्यांना 'या' वाणाच्या संशोधनाचे मिळाले स्वामित्व

author img

By

Published : Dec 23, 2019, 1:41 PM IST

Updated : Dec 23, 2019, 3:30 PM IST

डॉ. नवनाथ कसपटे यांनी 45 वर्षांच्या काळात जवळपास 40 सीताफळांच्या वाणांचा संग्रह करून ठेवला आहे. गोरमाळे येथील त्यांच्या मधुबन फार्मवर या सर्व वाणांचे प्लॉट पाहायला मिळतात. या वाणांवरच संशोधन करून त्यांनी एन.एम.के. वन गोल्डन या नवीन वाणाचा शोध लावला आहे. 2014ला अर्ज केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी पीक वाण संरक्षण शेतकरी हक्क कायद्याअंतर्गत या वाणाचे स्वामित्व मिळवले आहे.

dr
डॉ. नवनाथ कसपटे

उस्मानाबाद - अवघ्या अकरांवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या डॉ. नवनाथ कसपटे यांनी शोधलेल्या सीताफळाच्या वाणासाठी देशातील पहिले फळपिकाचे स्वामित्व आपल्या नावे केले आहे. त्यांच्या संशोधक वृत्तीसाठी बंगळुरू विद्यापीठाने त्यांना 2018 मध्ये 'डॉक्टरेट' ही मानस पदवी दिली आहे. म्हणून अल्पशिक्षित असूनही डॉक्टर ही ओळख त्यांना मिळाली आहे.

डॉ. नवनाथ कसपटे यांनी सीताफळाच्या वाणाच्या संशोधनाचे मिळवले स्वामित्व

सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे इथे कसपटे यांची 55 एकर कोरडवाहू शेती आहे. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीत चांगले उत्पन्न होत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा फळबागेकडे वळवला. सिताफळावर लक्ष केंद्रीत करण्याआधी त्यांनी 25 वर्ष द्राक्षाची यशस्वी शेती केली. डॉ. कसपटे यांनी 45 वर्षांच्या काळात जवळपास 40 सीताफळांच्या वाणांचा संग्रह करून ठेवला आहे. गोरमाळे येथील त्यांच्या मधुबन फार्मवर या सर्व वाणांचे प्लॉट पाहायला मिळतात. या वाणांवरच संशोधन करून त्यांनी एन.एम.के. वन गोल्डन या नवीन वाणाचा शोध लावला आहे.

हेही वाचा - यशोगाथा : दुष्काळावर मात करत जिरायती जमिनीवर पिकवली पेरुची बाग

2014ला अर्ज केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी पीक वाण संरक्षण शेतकरी हक्क कायद्याअंतर्गत या वाणाचे स्वामित्व मिळवले आहे. आता त्यांच्या परवानगीशिवाय या जातीच्या सिताफळाचे उत्पादन घेणे बेकायदेशिर ठरणार आहे. उत्तम दर्जाचे तसेच टीकाऊ फळ आणि जास्त उत्पन्न देणारे वाण असे या वाणाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. नवनाथ कसपटे यांच्या यांच्या शेतात दररोज 50 मजुरांना काम मिळते. देशातील जवळपास 18 राज्यांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या या सीताफळांच्या कलमांची विक्री होत आहे. दररोज 10 ते 20 शेतकरी त्यांच्या फार्मला भेट देतात. त्यांच्या एन.एम.के वन गोल्डन या वाणाला स्वामित्व मिळाल्याने आपण घेतलेले परिश्रम सार्थकी लागल्याची भावना कसपटे यांनी व्यक्त केली आहे.

Intro:
कृषी दिन स्पेशल

अकरावी शिकलेल्या अल्पशिक्षित डॉक्टरने शोधलं नवीन वाणाचे सिताफळ;देशात पहिल्यांदाच मिळाले फळपिकाला पेटंट

उस्मानाबाद- आज शेतकरी दिनानिमित्त आम्ही तुम्हाला एका अल्पशिक्षित डॉक्टरची यशोगाथा सांगणार आहोत ज्यांच्या प्रयत्नातून देशात पहिल्यांदाच सीताफळाला पेटंट मिळाले आहे डॉ नवनाथ मल्हारी कसपटे हे अकरावी पास आहेत मात्र तरीही त्यांना बेंगलोर विद्यापीठातून 2018 मध्ये डॉक्टरेट ही माणस डिग्री मिळाली आहे
डॉ. नवनाथ कसपटे सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे या गावचे आहेत त्यांची 55 एकर कोरडवाहू शेती आहे वर्षानुवर्षे पडणारा दुष्काळ यामूळे शेतीत चांगले उत्पन्न येत नव्हते आणि म्हणून त्यांनी फळबागेकडे आपला मोर्चा वळवला द्राक्षे, बोर, पपई, डाळिंबाच्या बागा लावल्या मात्र यातही म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी शेतात सिताफळ या फळपिकाची लागवड सुरू केली याच बागेत डॉ.नवनाथ कसपटे यांनी सिताफळावरती वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली या प्रयोगात त्यांना यश मिळाले आणि त्यांनी एन.एम.के. 1 (गोल्डन) या नवीन वाणाच्या सीताफळाचा शोध लावला. डॉ.नवनाथ कसपटे यांनी 45 वर्षाच्या संघर्षात जवळपास 40 सीताफळांच्या वाणांचा संग्रह करून ठेवला आहे. डॉ.कसपटे यांचे गोरमाळे येथे मधुबन फार्म आहे त्यात मध्ये 40 हून अधिक सीताफळाच्या वाणाचे संकलन करून लागवड केलेले प्रात्यक्षिक प्लॉट पाहायला मिळतात. आता या एन.एम.के 1 (गोल्डन) या वाणाच्या सीताफळाला 2001 अन्वय स्वामित्व प्राप्त झाले आहे. हे एन.एम.के 1(गोल्डन) हे फळ कमीत कमी अर्धा किलोपर्यंत तर जास्तीत जास्त दोन किलो पर्यंत मोठे होते याची उत्पादकता चांगली आहे त्यामुळे याच नावाने कमी उत्पादकता असलेल्या वाणाची विक्री करण्यात येत होती आणि यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत होती. मात्र आता एन.एम.के 1 (गोल्डन) या सीताफळाच्या वाणाची विक्री नवनाथ कसपटे यांच्या परवानगीशिवाय कोणीही विकू शकत नाही.यांनी निर्मित केलेल्या या सीताफळांच्या विक्री देशातील जवळपास 18 राज्यांमध्ये होत आहे 60 रुपयाला एक रोप याप्रमाणे विकले जात आहे दररोज 10-20 शेतकरी यांच्या फार्म ला भेट देतात तर दररोज 50 मजुरांना कसपटे यांच्या शेतात काम मिळते आहे. अल्पशिक्षित असलेल्या डॉ.कसपटे यांनी निर्मिती केलेल्या एन.एम.के 1 (गोल्डन) या वणाला देशात पहिल्यांदा स्वामित्व मिळाल्याने त्यांनी घेतलेले परिश्रम हे सार्थकी लागल्याचे कसपटे सांगतात

Body:यात शेतकऱ्याची byte आहे

या स्टोरीला चांगला व्हिओ देऊन चांगले pkg होवू शकते

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Dec 23, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.