उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील मुळज येथील तरुणाने एका मुलीची छेड काढल्यामुळे एका मुलाविरोधात गन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरगा पोलिसांत बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम, व अनुसूचित जाती जमाती अधिनियम कायद्याच्या आधारे मंगळवारी सकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी, की पीडित मुलगी ही उमरगा येथे शिक्षणासाठी मुळज गावाहून येणे जाणे करते. दरम्यान, गेल्या 4 महिन्यापासून मुळज येथील तरुण अजित लहू मुळजे हा पीडित मुलीची गावातून येताना व जाताना नेहमी छेड काढत होता. गाडीचे हॉर्न वाजविणे, हातावारे करणे, इशारे करणे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणून पीडित मुलीला त्रास देत होता.
हेही वाचा - तुळजाभवानी मंदिरातील 71 पुरातन नाणी गायब, अधिकाऱ्यांनीच लुटले मंदिर
आरोपीने काही दिवसापूर्वी एका मुलाजवळ पीडित मुलीला देण्यासाठी गिफ्टसुद्धा पाठवून दिले होते. तिने ते घेण्यास नकार दिला असता, बसस्टँडवर येऊन गिफ्ट का घेतले नाही? म्हणून तिला धमकावले. तेव्हा पीडित मुलीने हा सगळा प्रकार आई व आजोबांना सांगितला. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांनी त्याची समज काढली. यापुढे सदर मुलीला त्रास देणार नाही, असे सांगितले. मात्र, तरीही त्याचे हे कृत्य चालूच होते.
हेही वाचा - एचआयव्ही झालाय? अजिबात घाबरू नका, धैर्याने सामोरे जा
रविवारी 1 डिसेंबरला रात्री नऊ वाजता आरोपी, पीडित मुलीच्या घराकडे पाहून गाडीवर चकरा मारू लागला, गाडीचे हॉर्न वाजवणे चालू केले. रात्री मुलीच्या घरचे सर्वजण घरी झोपले असता, दाराला येऊन लाथा मारल्या. तसेच पीडित मुलीला बाहेर ये, नाहीतर तुझे घर पेटऊन देईन, अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपीने घर पेटऊन दिले. तेव्हा घरातील मंडळी बाहेर येताच आरोपी पळून गेला. त्यामुळे पीडित मुलीच्या व तिच्या नातेवाईकच्या जीवाला धोका असल्याने मंगळवारी सकाळी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्यानंतर उमरगा पोलिसांत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले या करत आहेत.