उस्मानाबाद (धाराशीव) : काँग्रेसला कर्नाटकमध्ये सत्तेत येऊन एका महिन्याहून कमी कालावधी झाला आहे. तर काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये भाजपाने लागू केलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार तसेचर सावरकरांवरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावरुन नवीन वाद सुरt झालेला असतानाच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस : कर्नाटक सरकारने सत्तेत आल्यानंतर पाठ्यपुस्तकातून वि दा सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वि दा सावरकर यांना तुम्ही पाठ्यपुस्तकातून काढाल, लोकांच्या मनातून कसे काढाल, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. सावरकर पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा हाच कर्नाटक पॅटर्न आहे का, असाही देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. सावरकर यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
काय आहे प्रकरण : कर्नाटक सरकारने सत्तेत येताच भाजप सरकारचे अनेक निर्णय बदलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यावरून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस सरकारने पाठ्य पुस्तकातील विं दा सावकर आणि हेडगेवारांचे धडे वगळले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसने निवडणुकीत याप्रकारचे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा -