ETV Bharat / state

जिल्ह्यातील आठवडी बाजारांत गर्दी, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठवडी बाजार बातमी

उस्मानाबाद जिल्ह्यातील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

बाजारातील गर्दी
बाजारातील गर्दी
author img

By

Published : Dec 5, 2020, 6:29 PM IST

उस्मानाबाद - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत आहे. यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व सुरळीत करण्यास मुभा दिली आहे. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधक सर्व काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र, सर्व नियम पायदळी तुडवत जिल्ह्यातील आठवडी बाजार भरवले जात आहे. यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे.

कोरोना बरोबर इतर आजारांची भीती, खाद्य पदार्थ उघड्यावर

जिल्ह्यात भरवण्यात येणाऱ्या आठवडी बाजारात भाजीपाल्यासह खाद्य पदार्थ उघड्यावर विकले जाते. त्यामुळे कोरोनासोबत इतर आजार पसरण्याची शक्यता आहे. या आठवडी बाजारात ग्रामीण भागातून भाजी खरेदी आणि विक्री करण्यासाठी लोक येतात. यामुळे कोरोनासह इतर आजारही वाढण्याची भीती काही नागरिकांतून वर्तवली जात आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे.

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यात पंधरा दिवसात रोखले तीन बाल विवाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.