ETV Bharat / state

चिंताजनक...उस्मानाबादमध्ये तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला - कोरोना अपडेट

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात दोन तर धानोरा तालुक्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

corona patient number raised in osmanabad
चिंताजनक...उस्मानाबादमध्ये तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
author img

By

Published : Apr 5, 2020, 8:59 AM IST

उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील बलसुर आणि लोहारा तालुक्यातील धानोरा या गावात दोन कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता उमरगा तालुक्यामधूनच तिसऱ्या पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. एकापाठोपाठ एक असे तीन रुग्ण जिल्ह्यामध्ये सापडले आहेत.

पुणे येथील प्रयोगशाळेत 56 व्यक्तींचे स्वॅब नमुने जिल्ह्यातून पाठविण्यात आलेले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा स्वॅब नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे. हा व्यक्ती उमरगा येथील असून उमरगा उपजिल्हा रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे. त्या रुग्णाची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.