ETV Bharat / state

उस्मानाबादेत कोण मारणार बाजी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

author img

By

Published : Oct 23, 2019, 7:48 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उस्मानाबाद जिल्हा यावेळी मात्र, राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात युतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर झालेला हल्ल्यामुळे हा जिल्हा चर्चेत राहीला याचाही परिणाम निकालावार होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद जिल्हा

उस्मानाबाद - राज्याच्या राजकारणात राजकीयदृष्टया संवेदनशील असणारा जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 4 मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2, काँग्रेसकडे 1 तर शिवसेनेने 1 जागा मिळवली होती. जिल्ह्यातील जेष्ट नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर झालेला हल्ल्यामुळे हा जिल्हा चर्चेत राहिला. शिवसनेचे मंत्री तानाजी सावंत देखील निवडणूक रिंगणात आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा असे एकुण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद मतदारसंघात विधानसभेला 2014 च्या तुलनेत मतादानात घट झाली आहे. तर परंडा मतदारसंघात टक्केवारी वाढली आहे.

मतदारसंघ आमदार पक्ष 2014 ची टक्केवारी 2019 ची टक्केवारी
उमरगा (राखीव) ज्ञानराज चौगुले शिवसेना 57.57 56.43
तुळजापूर मधुकरराव चव्हाण काँग्रेस 65.62 64.46
उस्मानाबाद राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 66.09 60.71
परंडा राहूल मोटे राष्ट्रवादी काँग्रेस 66.82 68.10

उमरगा (राखीव) - अनुसुचीत जाती -

2009 पासून हा मतदासंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात काँग्रेसचे रोहिदास भालेराव तर वंचितचे रमाकांत गायकवाड यावेळी रिंगणात आहेत. शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले दोन वेळा विजयी झाले आहेत. त्यांनी 2014 मध्ये किसन कांबळे तर 2009 मध्ये डॉ.बाबुराव गायकवाड यांचा पराभव केला होता.

तुळजापूर मतदारसंघ -

तुळजापूर मतदारसंघावर काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे राणाजगजितसिंह पाटील निवडणूक लढवत आहेत. तर वचिंतचे अशोक जगदाळे देखील रिंगणात आहेत. मधुकरराव चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. ते गेली 5 पंचवार्षीक येथून आमदार राहिले आहेत.

उस्मानाबाद मतदारसंघ -

या मतदासंघातून शिवेसेनेचे कैलास घाडगे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. 2014 च्या निवडणूकीत राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 88469 मते मिळवत विरोधी उमेदवार शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पराभव केला. राजेनिंबाळकर यांना 77663 मते मिळाली. तर 2009 मध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. यापूर्वी येथून पद्मसिंह पाटील यांनी 7 वेळा प्रतिनिधीत्व केले आहे.

परांडा मतदारसंघ -

परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहूल मोटे यांच्या विरोधात शिवनसेनेचे मंत्री असलेले तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. 2014 मध्ये राहूल मोटे यांनी शिवसेनेच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव केला होता. राहुल मोटे येथून 3 वेळा आमदार राहिलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उस्मानाबाद जिल्हा यावेळी मात्र, राष्ट्रवादीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात युतीचे पारडे जड असून तुळजापूर मतदारसंघात मधुकर चव्हाण निर्विवाद वर्चस्व राखण्याची शक्यता आहे. मात्र, उस्मानाबाद मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तर परंडा मतदारसंघात राष्ट्रवादीला आपला गड सोडण्याची चिन्हे दिसत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.