उस्मानाबाद - भारत बंदला उस्मानाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. चालू आठवड्यातील कालचा (दि. 29 जानेवारी) दुसरा बंद होता. वंचित बहुजन आघाडी आघाडीने पुकारलेल्या बंदनंतर अवघ्या पाच दिवसातच हा दुसरा बंद होता. त्यामुळे म्हणावा तसा प्रतिसाद या बंदला मिळाला नाही.
उस्मानाबाद शहर वगळता लोहारा, तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम, कळंब, वाशी या सातही तालुक्यातील बाजारपेठ सुरू होती. सतत विविध कारणाने बंद पुकारला जात असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ग्रामस्थांची, रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे सांगत उमरगा बाजारपेठ बंद न ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी महासंघाने घेतला होता. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते.
हेही वाचा - अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे धरणे
प्रत्येक वेळी होणाऱ्या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची फरफट होते. शिवाय व्यवसाय बंद ठेवल्याने व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होते. शहरात चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्यामुळे बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु बंदमुळे या रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगत या उमरग्यातील व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शविला.
हेही वाचा - धक्कादायक..! सोनारीतील 30 माकडांचा मृत्यू; कुंडातील पाण्यामुळे मृत्यूचे सावट?