उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल, मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मदत किती, कशी, कधी करायची, याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत काम सुरू आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होत आले असून, आढावा घेणे सुरू आहे. जी मदत करता येईल, ती केल्याशिवाय राहणार नाही. सणाच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पंचनामे पूर्ण होत आले असून, लवकरच मदतीची घोषणा करणार - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबाद
16:31 October 21
सणासुदीच्या काळात शेतकऱयांच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
16:22 October 21
जे करू ते ठोस करू, घाईत निर्णय घेणार नाही
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मुंबईत सध्या हालचाली सुरू आहेत. पंचनामे करून झाले असून, मदतीची घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत दिली.
15:48 October 21
केंद्राकडून जीएसटीची रक्कम येणं बाकी
केंद्र सरकारकडून राज्य सरकारला जीएसटीचा मोबदला येणे अजून बाकी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
15:40 October 21
एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीत स्वागत
भाजपाला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकनाथ खडसे आता आमच्या कुटुंबाचा एक भाग असून, त्यांचे मी महाविकास आघाडीत स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच एकनाथ खडसे यांना पक्षात घेण्याबाबत सेना आणि राष्ट्रवादीत बंद दाराआड चर्चा झाल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
15:16 October 21
पंचनामे पूर्ण होत आले असून, लवकरच मदतीची घोषणा करणार - मुख्यमंत्री
उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत. गेल्या आठवडा भरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी २ दिवासापूर्वी शरद पवार यांनी पाहणी केली आहे.