ETV Bharat / state

Leopard attacks On Bridegroom before marriage : लग्नाच्या अगोदर बिबट्याने घेतला नवरदेवाचा बळी - बिबट्याला जेरबंदची मागणी

नाशिक येथील गिरनारे येथे राहणाऱ्या अरुण गवळी या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी ( Young man dies in leopard attack ) गेला. चार दिवसांवर लग्न आले होते, लग्नाचा बस्ता आटोपून कुटुंबाच्या सदस्यांना पुढे पाठवून मागून येत होता. परंतु, येताना बिबट्याने केलेल्या हल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Attacked by a leopard
बिबट्याने केला हल्ला
author img

By

Published : May 24, 2022, 10:51 AM IST

नाशिक : नाशिकच्या गिरनारे येथे राहणाऱ्या अरुण गवळी याचा 1 जून रोजी विवाह होणार होता, मात्र त्याआधीच त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ( Death of a young man before marriage ) असून, या घटनेमुळे गिरनारे भागात शोककळा पसरली असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ( Demand for catching man-eating leopard )

घटनेचा तपशील : गिरनारे येथे दिलीप काशिनाथ थेटे यांच्या मळ्यात माळीवाडा आळीवपाडा येथे मजुरी करणारा अरुण गवळी हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह वास्तव्यास होता. शनिवारी त्याचा विवाहाचा बस्ता झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य हे पुन्हा गिरनारे येथे आले. अरुण काही कामे आटपून नंतर येणार म्हणून मागेच थांबला, मात्र तो घरी परतलाच नाही. परिवारातील लोकांना तो हरसूल येथे नातेवाइकांकडे थांबला असेल असे वाटले, पण दोन दिवस झाले तरी त्याचा शोध लागला नाही. तेव्हा कुटुंबातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. सोमवारी दुपारी संध्याकाळच्या दरम्यान त्याचा मृतदेह गिरनारे येथील भोपळ्याच्या मळ्यात एका बाजूला असंख्य लचके तोडलेल्या व छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला.

वनविभाग तातडीने घटनास्थळी : वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा हा बिबट्याने केलेला हल्ला असल्याचे व त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. विवाहाच्या आठ दिवसांपूर्वीच नवरदेवाच्या जीवावर बेतलेली ह्या घटनेने कुटुंबावर प्रचंड आघात झाला. वनविभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाईल, असं वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले.

बिबट्याचा बंदोबस्त करावा : गिरनारे भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण असून, वन विभागाच्या वतीने पिंजरे लावून इतर उपाययोजना कराव्यात, या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

हेही वाचा : leopard attack in Sangamner taluka : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; संगमनेर तालुक्यातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.