ETV Bharat / state

सोलापूर, औरंगाबादसह नागपुरात २५ जुलैला कृत्रिम पाऊस पाडणार - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील

राज्यात काही भागात पाऊस पडलेला आहे, तर काही भागात अद्यापही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. विशेषतः मराठवाड्यात पावसाची स्थिती फार बिकट आहे. त्यामुळे राज्यात कृत्रिम पाऊस पाडताना मराठवाड्याला विशेष प्राधान्य देण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jul 18, 2019, 5:23 PM IST

उस्मानाबाद - राज्यात पाऊस पडलेला नाही अशा भागात कृत्रीम पाऊस पाडण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी कृत्रीम पाऊस पाडण्याचे रडार सज्ज झाले असून येत्या २५ तारखेला पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य सरकार तयारी करीत असल्याचे भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. आज ते तुळजाभवानी येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

तुळजाभवानीचे दर्शन घेताना चंद्रकांत पाटील तसेच भाजमध्ये प्रवेश घेण्यासाठी कार्यकर्त्यांची झालेली गर्दी

राज्यात काही भागात पाऊस पडलेला आहे, तर काही भागात अद्यापही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. विशेषतः मराठवाड्यात पावसाची स्थिती फार बिकट आहे. त्यामुळे राज्यात कृत्रिम पाऊस पाडताना मराठवाड्याला विशेष प्राधान्य देण्यात येईल, असे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात ते टिकायला पाहिजे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. तसेच बारामतीच्या जागेबद्दल बोलतना त्यांनी स्मृती इराणींचे उदाहरण दिले. ते म्हणाले, स्मृती इराणी आमच्या प्रेरणास्थान आहेत. पहिल्यांदा अमेठीमधून पराभूत झाल्या. मात्र, त्यांनी अमेठीत जाऊन परत नव्याने लढा दिला. त्यानंतर त्या विजयी झाल्या. त्याचप्रमाणे आम्ही बारामतीत लढा देत आहोत. मात्र, अद्याप तेथे यश आले नसले तरी २०२४ मध्ये बारामतीची जागा नक्की जिंकू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

उस्मानाबादेत भाजप प्रवेशासाठी तुफान गर्दी -

चंद्रकांत पाटील यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेतला. यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांसह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. मोठ्य़ा पुढाऱ्यांपासून तर गाव पातळीवरच्या पुढाऱ्यांनी देखील भाजप प्रवेशासाठी गर्दी केल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. मात्र, आता पक्षासाठी काम करावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

Intro:जागा वाटपाचा फर्म्युला हा राज्यपातळीवर ठरणार आहे...

उस्मानाबाद - नूतन प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार घेताच त्यांनी आज प्रथमच तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. मराठा आरक्षण उच्च न्यायालय टिकले तसेच ते सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकावे यासाठी देवीचरणी प्रार्थना केली राज्यात काही भागात पाऊस आहे तर काही भागात पाऊस पडलेला नाही त्या भागात पाऊस पडावा राज्य दुष्काळमुक्त व्हावा यासाठी देवी प्रार्थना केली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले राज्यात पुन्हा देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली माहितीचे सरकार येईल असा विश्वास देखील चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला राज्यात ज्या ठिकाणी कमी पाऊस पडला आहे विशेषत मराठवाड्यात त्या ठिकाणी कृत्रिम पाऊस पडण्याच्या विचारात राज्य सरकार असून सोलापूर औरंगाबाद नागपूर या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचे रडार सज्ज आहे. पंचवीस तारखेला पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य सरकार तयारी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्मृती इराणी ह्या आमच्या प्रेरणास्थान आहेत त्या मिठीत पराभूत झाल्या पण त्यांनी अमेठीत जाऊन परत नव्याने लढा दिला त्या विजयी झाल्या तसेच आम्ही बारामतीत जाऊन गेली ती निवडणुका लढा देत आहोत आम्हाला आतापर्यंत यश आलेले नाही परंतु 2024 मध्ये आम्ही निश्चित बारामतीची जागा जिंकून दाखवू असा आशावाद चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.Body:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.