ETV Bharat / state

जल्लोष साऱ्या गावाचा.. बड्डे आहे भावाचा; उस्मानाबादमध्ये साजरा केला चक्क श्वानाचा वाढदिवस - मोत्याचा वाढदिवस

तुळजापूर तालुक्यातील अनदुर या गावातील नरेंद्र स्वामी यांचा लॅबराडर या प्रजातीचा श्वान, मोत्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. एवढेच नाही तर येथील आण्णा चौकात मोत्या मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देणारे डिजीटल बॅनरही लावण्यात आले होते. येथे पहिल्यांदाच झालेल्या या अनोख्या वाढदिवसाची गावभर चर्चा होती.

birthday of a dog
author img

By

Published : Sep 11, 2019, 10:56 PM IST

उस्मानाबाद- दहा ते पंधरा वर्षांपूर्वी लोकांचे वाढदिवसावर क्वचितच लक्ष असायचे. मात्र फेसबुक आले आणि लोकांनी वाढदिवसाबाबत जागरूक होत एकमेकांना शुभेच्छा देण्याचा, वाढदिवस साजरा करण्याचा एक अलिखीत नियमच तयार करून टाकला. एवढे कमी होते की काय आता मोत्याचा वाढदिवसही साजरा होत आहे. हा मोत्या कोण तर तुळजापूर तालुक्यातील अनदुर या गावातील नरेंद्र स्वामी यांचा लॅबराडर या प्रजातीचा श्वान.

श्वानाचा वाढदिवस

या मोत्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. एवढेच नाही तर येथील आण्णा चौकात मोत्या मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देणारे डिजीटल बॅनरही लावण्यात आले होते. यात प्रेरणास्थान म्हणून गावातील वयाची सहा वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ लॅबप्रजातीच्या 'ठोल्याचे' चित्रही होते. त्यावर चष्मा घातलेला रुबाबदार मोत्या तर शुभेच्छूक म्हणून रॉकी, बादल, जिम्या, सारा, पकी, चार्ली, मिलकी व जिमी या लॅब, रॉटव्हीलर व पग जातीच्या श्वानांची छायाचित्रे लावण्यात आली होती. यात चार महिन्यांची जिमी व दोन महिन्यांची मिलकीचाही समावेश होता.

हे प्राणी प्रेम इथेच न थांबता रात्रीच्या दरम्यान हुतात्मा स्मारकाच्या मैदानात नरेंद्र स्वामी हे आपल्या मोत्यासह तर सोनु बोर्डे, गजानन मोकाशे, केदार कर्पे, लालु पोतदार, श्रीशैल आलुरे, ओंकार स्वामी, आनंद घोडके, नितीन सुरवसे, हृतीक कंदले हे वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपापली श्वाने घेऊन दाखल झाले. तिथे मोत्याला पुष्पहार घालून केक कापण्यात आला. तसेच फटाके फोडून मोत्याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. येथे पहिल्यांदाच झालेल्या या अनोख्या वाढदिवसाची गावभर चर्चा होती.

Intro:मोत्याचा वाढदिवस गावभर चर्चा

उस्मानाबाद- दहा ते पंधरा वर्षांपूर्वी लोकांचा वाढदिवस हाक्वचितच लक्षा असायचं मात्र फेसबुक आले आणि झुक्याने सर्वांच्या वाढदिवसाची नोंद केली त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत वाढदिवस साजरा करण्याचा फॅड चांगलंच डोक्यात शिरलयं मात्र उस्मानाबाद मध्ये असा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे ते पाहून तुम्हीही चक्रावून जाल तुळजापूर तालुक्यातील अनदुर या गावातील नरेंद्र स्वामी यांनी 'मोत्याच्या' वाढदिवस साजरा केला आता मोत्या कोण तर लॅबराडर या प्रजातीच्या कुत्र्याचे नाव 'मोत्या', आणि या कुत्र्याचा पहिला वाढदिवस जंगी साजरा करण्यात आला फक्त वाढदिवस साजरा करण्यात आला नाही तर येथील आण्णा चौकात मोत्या मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा डिजीटल लावण्यात आले होते. यात प्रेरणास्थान म्हणून गावातील वयाची सहा वर्षे घातलेल्या जेष्ठ लॅबप्रजातीच्या 'ठोल्याचे' चित्र होते त्यावर गॉगल घातलेला रुबाबदार मोत्या तर शुभेच्छूक म्हणून रॉकी,बादल, जिम्या, सारा,पकी,चार्ली,मिलकी व जिमी या लॅब,रॉटव्हीलर व पग जातीच्या श्वानांची छायाचित्रे लावण्यात आली होती यात चार महिन्याची जिमी व दोन महिन्याची मिलकीचा समावेश होता . हे प्राणी प्रेम इथेच थांबले नाही तर रात्रीच्या दरम्यान हुतात्मा स्मारकाच्या मैदानात नरेंद्र स्वामी हे आपल्या मोत्यासह तर सोनु बोर्डे, गजानन मोकाशे,केदार कर्पे, लालु पोतदार, श्रीशैल आलुरे,ओंकार स्वामी, आनंद घोडके, नितीन सुरवसे,हृतीक कंदले हे वाढदिवसास सभेच्छा देण्यासाठी आपली कुत्रे घेऊन दाखल झाले. तिथे मोत्याला पुष्पहार घालून केक कापण्यात आला तसेच फटाके फोडून मोत्याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठी गर्दी जमली होती. येथे पहिल्यांदाच झालेल्या या अनोख्या वाढदिवसाची गावभर चर्चा होती.Body:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.