ETV Bharat / state

तुळजाभवानीच्या प्राचीन अलंकारावर धार्मिक व्यवस्थापकानेच मारला डल्ला, नाईकवाडीला अटक

महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे.

author img

By

Published : Sep 20, 2021, 3:34 PM IST

Tulja Bhavani
Tulja Bhavani

उस्मानाबाद - महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता. मात्र अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नाईकवाडी याने 35 तोळे सोने, 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता.

दोन वर्षांपूर्वी दाखल केली होती लेखी तक्रार -

नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्प्या-टप्प्याने पुरातन नाणी गायब केली आहेत. त्यामुळे या काळात त्यांना कोण मदत केली ? त्यांचे साथीदार व सूत्रधार कोण ? ही नाणी सध्या कुठे आहेत यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती.

हे ही वाचा - भयानक.. रशियाच्या पर्म विद्यापीठात अज्ञाताचा अंदाधून गोळीबार, 8 जणांचा मृत्यू

अहवालात नाईकवाडी दोषी -

त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती. त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली.

गुन्हा दाखल -

त्याचा ताब्यात असलेल्या तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 348.661 ग्रॅम सोने व सुमारे 71698.274 ग्रॅम चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

हे ही वाचा - देवेंद्र फडणवीस दबंग नेता, 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील

तत्कालीन जिल्हाधिकारी मुधोळ यांची बदली झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिल्यावर रविवार, 13 सप्टेंबर 2021 रोजी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार योगिता कोल्हे यांनी फिर्याद दिल्याने तात्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी विरोधात फसवणूक गुन्हा दाखल केला होता.

..या 71 प्राचीन नाण्यांसह अनेक दागिने गायब -

तुळजाभवानी देवीला अनेक राजे राजवाडे यांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान व प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून गैरव्यवहार केल्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या 3 सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यात नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्कामोर्तब केले होते. तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनौ, बडोदा आणि इंदौर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवी चरणी अर्पण केली होती. या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती. त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते. अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्याने अनेक बाबी उघड होतील.

तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती. त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती. मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असून यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत. या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकाऱ्यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.