उस्मानाबाद - मागील 44 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला कोरोनाचा फटका बसला आहे. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू होते. यामध्ये कफन घालून, तिरडी उठाव, जनाजा उठाव अशा प्रतिकात्मकदृष्ट्या विरोध दर्शवण्यात येत होता. तसेच उपोषण देखील करण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
जोपर्यंत एनआरसी आणि सीएएला विरोध दर्शवण्यासाठी हे साखळी आंदोलन पुकारण्यात आले होते. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा संघर्ष समितीकडून देण्यात आला होता. मात्र आता कोरोनामुळे आंदोलकांना माघार घ्यावी लागली आहे.