उस्मानाबाद - जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तालमवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आज शुभारांभ करण्यात आला. तामलवाडी येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होणार आहेत. ७६ हजार ४३७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास अंदाजित ७७७ कोटी रुपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. तामलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख, तहसिलदार सौदागर तांदळे, सहाय्यक निबंधक विद्याधर माने यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी तामलवाडी येथील २०२ तर पाथरूड येथील ११० पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले.
हेही वाचा- अजित पवारांचे सोयरेच म्हणतात.. महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी