ETV Bharat / state

Omicron 3rd Patient Osmanabad : उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला; 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह - District Hospital Osmanabad

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हॅरिएंटचा ( Covid 19 Omicron Variant ) प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्ह्यात तिसरा रुग्ण सापडला ( Omicron 3rd Patient Osmanabad ) आहे. बावी येथील एका १३ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला ( 13 Years Girl Omicron Positive ) असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात ( District Hospital Osmanabad ) सुरु आहेत.

ओमायक्रॉन
ओमायक्रॉन
author img

By

Published : Dec 22, 2021, 11:03 AM IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण ( Omicron 3rd Patient Osmanabad ) आढळला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बावी 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह ( 13 Years Girl Omicron Positive ) आला आहे. यापूर्वी संयुक्त अरब अमिरात येथून आलेल्या 41 वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या मुलाचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सदरील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी एका 13 वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता बावी गावात ओमायक्रॉनचा बाधित रुग्णांची संख्या 3 वर पोहचली आहे.

जिल्ह्यात सलग दोन दिवस एकही कोरोना रुग्ण नाही

ओमायक्रॉनचा पॉझिटिव्ह ( Covid 19 Omicron Variant ) आलेल्या सदरील मुलीवर जिल्हा रुग्णालयात ( District Hospital Osmanabad ) उपचार सुरू आहेत. ही बाब चिंताजनक असली तरी, उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दोन दिवस कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही ही दिलासादायक बाब आहे. मंगळवारी कोरोना उपचार घेतल्यानंतर 4 रुग्ण बरे झाले. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ 13 सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मंगळवारी 1 हजार 379 नमुने तपासण्यात आले. त्यात एकही नमुना पॉझिटिव्ह आला नाही.

बावी गाव रेड झोन घोषित

उस्मानाबाद जिल्ह्यातील बावी या गावात ओमायक्रॉनचे 3 रुग्ण सापडल्याने या गावाच्या सीमा बंद करून कलम 144 लागू करण्‍याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर डॉ योगेश खरमाटे यांनी काढले आहेत. बाबी या गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी तातडीने नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आले असून, बावी गावापासून तीन किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 3 किलोमीटरपर्यंतचा परिसर रेड झोन तर, 7 किलोमीटर पर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

मोहा गावात आलेल्या त्या रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत

गेल्या आठवड्यात कळंब तालुक्यातील मोहा गावात एक कुटुंब घाना या देशातून परतले होते. विमानतळावर त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र जिल्ह्यात आल्यानंतर प्रशासनाने अरटीपीसीआर टेस्ट केली असता, दोघाही पिता- पुत्रांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात 2 वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. सध्या बाधित आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने ओमायक्रॉन टेस्टसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसात सदरील अहवाल प्राप्त होतील, असे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील आजपर्यंतची कोरोनाची परिस्थिती

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 65 हजार 644 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के आहे. तर 67 हजार 735 पैकी 1 हजार 507 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण हे 2.22 टक्के इतके आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 1507 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे. तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.