उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील एका अवलीयाने स्वतःच्या 54 एक्कर शेतीवर पर्यावरण पूरक वनशेती केली आहे. या शेतातील काठ्यादांड्या विकून ते वर्षाला 1 कोटीचा टर्न ओव्हर करत ( Turn over of crores per annum ) आहे. या शेतीला नांगरणी, मोघडन, खुरपणीची गरज नाही. मजुरांची गरज लागत नाही, तसेच शेतीसाठी लागणार कुठलेच अवजार नाही. यांच्या वडिलांनी याच शेतात काबाड कष्ट केले. पण पाहिजे तस उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे वनशेतीकडे वळून वर्षाला 1 कोटींचा टर्नओव्हर करू लागले आहेत. त्यांची ही वनशेती शेतकऱ्यांना वेगळा मार्ग दाखवणारी ( Forestry shows a different way to farmers ) आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारी आहे.
54 एक्कर वडिलोपार्जित जमीन : उस्मानाबाद जिल्ह्यातील राजशेखर पाटील यांची कळंब तालुक्यातील निपाणी या गावात 54 एक्कर वडिलोपार्जित जमीन आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक शेतीकरत परंतु हाती कष्ट आणि खर्चाच्या तुलनेत फारच कमी उत्पन्न, त्यामुळे काहीतरी वेगळे शेतीत केले पाहिजे, म्हणून राजशेखर पाटील वनशेतीचा मार्ग निवडला. त्याला कारणही तसंच होत. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात परिचित आहे. त्यामुळे कमी पाण्यात कमी खर्चात आणि कमी व्यवस्थापन लागणारी शेती करणे गरजेचे होत म्हणून ही वनशेती करायला सुरुवात केली.
जास्त फायदा मिळवून देणारी शेती करणे काळाची गरज : आज राजशेखर पाटील यांनी बांधकामासाठी लागणारे सुरुची 25 हजार झाडं,एक लाख रेनब्लुपक्ट्स आणि बांबू एककोटी पेक्षा जास्त लावली आहेत. या झाडांपासून दांड्या तयार केल्यात आहेत. आज त्या किमान शंभर रुपयाला एक याप्रमाणे चाळीस हजार ते एक लाख दांड्या आणि काठ्या विकत आहेत. त्यातून ते वर्षाकाठी किमान एक कोटी रुपयांची कमाई करू लागले आहेत. पाऊस कमी झाला काय आणि जास्त झालाय काय याचा राजशेखर पाटील यांच्या शेतीला फरक पडत नाही. कमी व्यवस्थापनाची आणि जास्त फायदा मिळवून देणारी शेती करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पाटील यांच्यासारखे प्रयोग जर शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली तर निश्चितच त्याचा फायदा होईल.