उस्मानाबाद - तुळजापूर येथून भूमला जाणाऱ्या योगेश दत्तात्रय मारगड यांना मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. योगेश मारकड हे त्यांचा आजीच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने पैसे घेऊन सोलापूर कॅनरा बँक येथून मोटरसायकलवरून तुळजापूर मार्गे भूमला जात होते.
हेही वाचा- कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त
सोलापूर येथील आरोपींनी मारकड यांच्यावर पाळत ठेऊन त्यांना सांगवी मार्डी येथे थांबवले. 'तू गाडी एवढ्या वेगाने का चालवतोस, त्यामुळे आमच्या डोळ्यात धूळ जात आहे,' असे म्हणून त्यांना मारहाण केली. तू पोलीस ठाण्यात चल असे म्हणून त्याला जबरदस्तीने गाडीवर बसवून कासारी शिवारात नेऊन त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्यांच्या जवळील रोख रक्कम 2 लाख 50 हजार जबरदस्तीने काढून घेतले.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये सीसीटीव्ही फुटेज व संशयित आरोपी रिक्षाचालक या आधारावर तपास करण्यात आला. यात 24 तासामध्ये 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 97 हजार 500 व गुन्ह्यात वापरलेले वाहन ऑटोरिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.