उस्मानाबाद - नाकाबंदी करत असताना पोलिसांना एका कारमध्ये 50 किलो गांजा सापडला. याप्रकरणी बार्शी तालुक्यातील जामगाव येथील दोघे आणि भुम तालुक्यातील पारधी पिढी येथील दोघांना, अटक करण्यात आली आहे. भुम पोलिसांनी ही कारवाई केली.
पशुखाद्याच्या दोन पोत्यामंध्ये होता गांजा-
चिंचोली फाटा येथे नाकाबंदी दरम्यान तपासणी करत असतांना एका चारचाकी वाहनात गांजा आढळून आला. पशुखाद्याच्या दोन पोत्यामंध्ये 25 पूड्यामध्ये ऐकून 50.30 किलो गांजा मिळाला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल-
याप्रकरणी जामगाव येथील अविनाश काळे, सुरेश काळे आणि पारधी पिढी येथील दत्ता काळे व राघू शिंदे या चौघांविरुद्ध एनडीपीएस कलम 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोहेकॉ- सोनार, यांच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा- अकोल्यात ५०० रुपयाच्या बनावट नोटा चालवणाऱ्या दुकडीला अटक