उस्मानाबाद- फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्हा रुग्णालयातील पाच पैकी फक्त एकाच बोअरवेलमध्ये पाणी आहे. त्यामुळे रुग्णालयाला नगरपालिकेकडून काहीप्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची गरज तात्पुरती भागवली जात आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयावरील हे पाणी संकट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे.
हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया
जिल्ह्याला वारंवार कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे दुष्काळी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण दाखल होतात. या रुग्णांना सरासरी एका दिवसाला 200 लिटर पाणी लागते. त्याचबरोबर याच परिसरात रुग्णालयातील कर्मचारीही वास्तव्यास आहेत. त्यामुळे या रुग्णालयात पाण्याचा वापर जास्त आहे. मात्र, गेल्या वर्षी पडलेल्या अल्प वृष्टीचा फटका रुग्णालयातील बोअरवेलला बसला आहे. पाच पैकी फक्त एकाच बोअरवेलमध्ये पाणी आहे.