उस्मानाबाद - हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि एन्काऊंटर प्रकरण ताजे असताना गुरुवारी जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - ..न भरलेल्या १ लाख ४४ हजारांचे बिंग फुटू नये म्हणून जाळले एटीएम
शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये एका तरुणीच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी उमेश पवारसह अन्य तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. ढोकी पोलीस ठाणे येथे पप्पू दगडू कांबळेविरुध्द महिलेला जिवंत ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तर अशीच घटना भूम येथे घडली असून बाबासाहेब यशवंता कुटेविरुध्द महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तीन विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्या असून या प्रकारामुळे महिलांची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध विनयभंगाच गुन्हा दाखल झाला असला तरी जिल्ह्यात अशा तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.