ETV Bharat / state

जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 17 कैदी बाधित - osmanabad corona update

उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून 17 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. उस्मानाबादमधील एकूण बधितांची संख्या 418 वर पोहोचली आहे.

osmanabad
जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
author img

By

Published : Jul 14, 2020, 8:50 PM IST

उस्मानाबाद - जिल्हा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून 17 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

17 कैदी आणि इतर असे 33 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

या अहवालात शहरातील माळी गल्ली येथील सात रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे त्या माध्यमातून कारागृह उस्मानाबाद येथील 58 कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 17 जणांंचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्याने 400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पार केला असून आज (दि. 14 जुलै) संध्याकाळपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दुपारपर्यंत आलेल्या आकडेवारीत 418 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 250 रुग्णांनी कोरोना विषानुवर मात केली असून 17 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 151 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह अद्याप उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.