मनमाड (नाशिक) - शहरासह नांदगाव तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी बुधवारी (दि. 7 एप्रिल) मनमाड शहरातील काम सुरू असलेल्या डिसीएचसी कोविड सेंटरला भेट देऊन संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत कोरोना सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सेंटरमध्ये किमान 50 बेडचे ऑक्सिजनयुक्त दुसरे सेंटर सुरू करण्यासाठी सूचना केल्या. यावेळी त्यांनी तालुका आरोग्य यंत्रणेसह सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर काम करून हे दोन्ही सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या.
मनमाडसह नांदगांव तालुका वाळीत
मनमाड शहरासह नांदगांव तालुक्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता हव्या तशा उपाययोजना आरोग्य विभाग करत नसल्याचा आरोप नागरिक करत असून तब्बल वर्षभरानंतर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वच क्षेत्राने मनमाड शहरासह नांदगांव तालुक्याल वाळीत टाकले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यावेळी मनमाडचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. जी. एस. नरवणे, शिवसेना गटनेते गणेश धात्रक, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे, रेल्वेचे अधिकारी मो. फैज तहसीलदार, उदय कुलकर्णी, प्रांताधिकारी कासार यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - नांदगावच्या वाखारी येथील हत्याकांडाचा अखेर उलगडा, तीन आरोपींना अटक