ETV Bharat / state

Teachers Car Accident : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कारचा भीषण अपघात.. तीन शिक्षक जागीच ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

प्राथमिक शाळेचे शिक्षक कारने प्रवास करत असताना कंटेनर आणि कारचा भीषण अपघात ( Teachers Car Accident ) झाला. या अपघातात ३ शिक्षक जागीच ठार झाले ( 3 Teachers Died In Road Accident ) असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगावजवळ हा अपघात ( Accident Near Igatpuri Of Nashik ) झाला.

author img

By

Published : Jan 5, 2022, 10:50 PM IST

अपघात
अपघात

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील ( Accident Near Igatpuri Of Nashik ) मुंढेगावजवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. पलटी घेताना कंटेनर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर जाऊन ( Teachers Car Accident ) धडकला. या अपघातात कारमधील जिल्हा परिषद शाळांचे 6 शिक्षक आणि शिक्षिका असल्याचे समजते. दुपारी साडेचार वाजता झालेल्या ह्या अपघातात 3 शिक्षक जागीच ठार ( 3 Teachers Died In Road Accident ) तर 3 शिक्षक, शिक्षिका गंभीर जखमी झाले आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या कारचा भीषण अपघात.. तीन शिक्षक जागीच ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

गंभीर जखमींची प्रकृती चिताजनक

गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असुन त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात ( District Hospital Nashik ) उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समजताच जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी 3 गंभीर जखमी शिक्षिकांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घोटी टोलनाका रुग्णवाहिकेचे 3 गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले.

वाहतूक विस्कळीत

दरम्यान, ह्या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. तालुक्यातील मुंढेगाव येथे महामार्गावर नाशिककडून येणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. पलटी घेत घेत हा कंटेनर MH 15 EB 0797 ह्या वाहनावर गेला. त्यामुळे ह्यामधील 3 शिक्षक जागीच ठार आणि 3 शिक्षक, शिक्षिका गंभीर जखमी झाल्या आहेत. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक असल्याचे समजते. शेवंता दादू रकीबे (वय 42), गीतांजली कापडणीस -सोनवणे (वय 42, रा. नाशिक) ह्या गंभीर जखमी असून, अन्य 2 जखमींची आणि ठार झालेल्यांची नावे समजली नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.