ETV Bharat / state

मनमाड रेल्वेस्थानकवर थरार; चाकूने सपासप वार करून तरुणाचा निर्घृण खून - Manmad Latest News

मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन असुन येथे रोज काहीना काही घटना घडत असतात. काल रात्री उशिरा येथे एका तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मैत्रिणीला फेक आयडी बनवून त्रास दिल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

manmad
मनमाड
author img

By

Published : Nov 6, 2021, 9:03 AM IST

मनमाड - मनमाड रेल्वे स्थानकावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणाची चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना रात्री उशिरा मनमाड शहरात घडली. शिवम पवार असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव असुन मैत्रिणीची फेक आयडी बनवुन तिला त्रास देत असल्याने इतर 5 जणांनी त्याची हत्या केल्याचे वृत्त आहे.

मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक असुन येथे रोज काहीना काही घटना घडत असतात. काल रात्री उशिरा येथे एका तरुणाचा चाकूने वार करून खुन करण्यात आला. मैत्रिणीची फेक आयडी बनवून तिला त्रास देत असल्याचे कारण सांगून हा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी नेमकी घटना काय हे पोलिसांच्या तपासात समोर येईल. रेल्वेच्या आरपीएफने सर्व माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली असुन त्यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सर्व आरोपी उल्हासनगर येथील -

मनमाड रेल्वे स्थानकावर रात्री उशिरा तरुणाला चाकूने सपासप वार करत निर्घृणपणे खुन करणारे सर्व तरुण आरोपी हे उल्हासनगर येथील असल्याचे समजते रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असुन वरिष्ठ अधिकारी येऊन तपासणी करून आरोपींना अटक करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.