ETV Bharat / state

Murder In Nashik : फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाची हत्या - फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाच्या डोक्यात लोखंडी

फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाच्या डोक्यात लोखंडी सळई मारुन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सातपूरमध्ये घडली आहे. सातपूर गावातील गोरक्षनाथ रोड मळे परीसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या परप्रांतीय तरुणांमध्ये (दि. 17 जानेवारी) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास वाद झाला, त्यातून संतोष जयस्वाल या परप्रांतीय तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Youth killed in Nashik district over Facebook post dispute
फेसबुक पोस्टच्या वादातून युवकाची हत्या
author img

By

Published : Jan 18, 2023, 5:34 PM IST

नाशिक : सोनवणे चाळीतील मुन्ना निषाद व रामकिशन निषाद नावाच्या परप्रांतीय संशयितांनी काश्मिरे चाळीतील संतोष जयस्वाल (वय 30, मुळ रा. आझमगड) या युवकास लोखंडी राॅडने डोक्यात मारुन गंभीर मारहाण केली. जखमी संतोष जयस्वाल याला त्याच्या नातेवाईकांनी सातपूर येथील खासगी तसेच ईएसआय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने जखमी संतोषला तपासून मृत घोषित केले.

हसल्याची कमेंट टाकली : घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, गुन्हा शोध पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहचले. दरम्यान, संतोष जयस्वाल मयत झाल्याचे समजताच मारहाण करणारा संशयित रामकिशन निषाद व त्याचे अन्य साथीदार फरार झाले. पोलिसांनी शाेध घेत फरार मुन्ना निषाद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संतोष जयस्वाल हा गॅरेज मॅकेनिकचे काम करीत होतो. संतोष याने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर संशयित आरोपीने हसल्याची कमेंट टाकली होती, यावरून दोघांचे वाद असल्याचे समजते.

व्यापारी वर्गात दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची पोलिसांकडून धिंड : नाशिकमधील मध्यवर्ती भाग असलेल्या दहीपुल परिसरात व्यापारी वर्गात दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. रविवारी रात्री दहीपुल परिसरात या संशयित दंगेखोरांनी काही दुकानांची तोडफोड करून एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. या परिसरात पोलिसांनी संशयितांची धिंड काढून जरब बसवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या कारवाईचे व्यावसायिकांनी स्वागत केले. दरम्यान, हल्ला केल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : चालत्या बसमध्ये महिलांच्या पर्स चोरणाऱ्या , दोन सख्ख्या भावांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.