ETV Bharat / state

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या घरच्यांनी तरूणाला जीवंत जाळले - nashik love affair news

देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रेम प्रकरणातून मुलाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात ( lover burnt alive in nashik ) आला आहे. या दुर्घटनेत तरुण ५५ टक्के भाजला असून त्यांच्यावर देवळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोहणेर येथील गोरख बच्छाव याला प्रेम प्रकरणातून त्याच्याच प्रेयसीच्या घरच्यांनी जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ संशयिताना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

nashik news
नाशिक न्यूज
author img

By

Published : Feb 11, 2022, 6:36 PM IST

नाशिक - देवळा तालुक्यातील लोहणेर येथे प्रेम प्रकरणातून मुलाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दुर्घटनेत तरुण ५५ टक्के भाजला असून त्यांच्यावर देवळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोहणेर येथील गोरख बच्छाव याला प्रेम प्रकरणातून त्याच्याच प्रेयसीच्या घरच्यांनी जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ संशयिताना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

lover burnt alive in nashik
गोरख काशिनाथ बच्छाव

लग्न मोडल्याने मुलाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न -

नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असतानाच देवळा तालुक्यात एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोनेर येथील एका तरुणाला जीवंत जाळण्याचा ही घटना आहे. लोहोनेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण होते. मात्र मुलीच्या घरच्यांना हे पसंत नव्हते. त्यामुळे मुलीला स्थळे दाखविण्याचे काम चालू होते. मात्र या मुलामुळे ही स्थळे मोडली जात असल्याचे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने मुलाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे.

पेट्रोल टाकून जाळून देण्याचा प्रयत्न -

देवळा पोलिसांनी दिलेली माहिती दिली की, लोहनेर येथील गोरख काशिनाथ बच्छाव वय 31 हा युवक रावळगाव येथील युवतीच्या गेल्या तीन वर्षापासून संपर्कात होता. यातून दोघांमध्ये प्रेम प्रकरणाचे संबंध आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर संबंधित युवतीचे लग्न घरच्या मंडळींनी आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संबंधितांना या प्रकरणाची माहिती मिळाली असावी असा अंदाज व्यक्त करत तिचा विवाह मोडण्यात आला. याचा राग अनावर होऊन तीच्या घरच्यांनी 11 फेब्रुवारी दुपारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गोरख बच्छाव यास शिवीगाळ केली. याबाबत त्याने आपला काही संबंध नसून मी आजही ही लग्न करण्यास तयार आहे. असे सांगत राहिल्याने युवतीच्या घरच्यांनी तू लोहनेर येथे थांब आम्ही पंचायत जवळ आलो. असे सांगून त्याला बोलावून घेतले व तिच्या आई वडील भाऊ यांनी त्याला डोक्याला लोखंडी राँड मारून जखमी केले. व संबंधित युवतीने त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकले. यामुळे युवक 55 टक्के भाजला असून त्यास तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून नाशिक येथे हलविण्यात आले.

पाच जण ताब्यात -

देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी रावळगाव येथील असून त्यांची नावे याप्रमाणे कल्याणी गोकुळ सोनवणे (वय 23), गोकुळ तोगल सोनवणे (वय 57), निर्मला सोनवणे (वय 52), हेमंत सोनवणे (वय 30), प्रसाद सोनवणे (वय 18), यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माधवी कामनी पोलीस उपविभागीय अधिकारी कळवण अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली देवळा पो.नि. दिलीप लांडगे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - Girl Dead in Bus Accident Nashik : नाशकात बस अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.