येवला (नाशिक)- येवला शहरासह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मका, कांदा आणि कापूस या पिकांना मोठा फटका बसू शकतो. पावसामुळे झाकून ठेवलेला मका पीक तसेच लागवडीतील लाल कांद्याला मोठा फटका बसू शकतो. तर कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात भिजले आहे. लागवडीतील कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
पिकांचे नुकसान
तालुक्यातील अंदरसुल, नगरसुल, रेंडाळे, ठाणगाव अशा अनेक गावांत तिसऱ्या दिवशीही पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे झाकून ठेवलेला मका पीक तसेच लागवडीतील लाल कांद्याला मोठा फटका बसू शकतो. तर कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात भिजले आहे. सर्वाधिक नुकसान लागवडीतील कांदा पिकाचे होत आहे. या अवकाळी पावसामुळे लाल व रांगडा कांद्याचे नुकसान होईल. आता पुन्हा अवकाळी पावसाने रोगाचा मोठा प्रादुर्भाव वाढणार असून याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे.
हेही वाचा - हलक्या वाहनांना राज्य सरकारचा 'टोल' वसुलीत दिलासा
पावसाने पिकांत साचले पाणी
पावसामुळे कांद्याच्या वाफ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पीक पूर्णत: पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे नुकसानाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील सातबारा संगणकीकरण आणि डिजिटायझेशन प्रणालीचे काम कौतुकास्पद - महसूलमंत्री