नाशीक - संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून 2 दिवस ही यात्रा सुरु असते. कपाळावर टिळा, गळ्यात तूळशीची माळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरनगरीत दाखल झाले आहेत. टाळ मृदूंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने त्र्यबकनगरी दुमदुमून गेली आहे. निवृत्ती महाराज यात्रात्सवा निमीत्त पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापूजा करण्यात आली. दुपारपर्यंत महाराष्ट्रासह अनेक राज्यातून ४०० हुन अधिक दिंड्या ईथे दाखल होणार आहेत. निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लावल्या असून वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
वारकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून देखील योग्य ती काळजी घेतली गेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने जवळपास ३०० बसचे नियोजन करण्यात आले आहे. निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात दर्शनबारी उभारण्यात आली आहे.