ETV Bharat / state

नाशिकचे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य, लंडनच्या वर्ल्ड ट्रेड मार्ट प्रदर्शनात झळकलं

आज महाराष्ट्र महाराष्ट्र पर्यटन स्टॉलचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यटन सचिव विनिता सिंगल पर्यटन, उपसंचालक रामदास खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

author img

By

Published : Nov 6, 2019, 3:29 PM IST

नाशिक - इंग्लंडची राजधानी लंडन शहरात आजपासून 'वर्ल्ड ट्रेड मार्क प्रदर्शना'ला सुरूवात झाली असून या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानेदेखील सहभाग दर्शवला आहे. महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळाची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह, हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक आणि अधिकाऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

आज महाराष्ट्र महाराष्ट्र पर्यटन स्टॉलचे उद्घाटन केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यटन सचिव विनिता सिंगल पर्यटन, उपसंचालक रामदास खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लंडनच्या वर्ल्ड ट्रेड मार्ट प्रदर्शनाची झलक

महाराष्ट्र पर्यटनाच्या स्टॉलमध्ये राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गड-किल्ले, अजिंठा-वेरूळ, एलिफंटा आदी विविध ऐतिहासिक गुंफांचे वैभव, व्याघ्र पर्यटन (ताडोबा अभयारण्य), समुद्र किनारे, जंगले, कास पठारसारखी जगातील वारसास्थळे, तीर्थक्षेत्र, लोणावळा-महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान आणि थंड हवेची ठिकाणांच्या पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शनात देण्यात आली.

त्याशिवाय महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव, खाद्यसंस्कृती, बॉलीवूड चित्रनगरी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यटन वैभव आदी माहितीही यावेळी देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटनाचा आकर्षक स्टॉलची संकल्पना मेरकी कम्युनिकेशन्सने मांडत त्यांची बांधणी केली आहे.

राज्याच्या पर्यटन सचिव विनिता सिंघल यांनी सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची माहिती दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्राला भेट द्या, असे आग्रहाचे निमंत्रण देखील यावेळी दिले. दरम्यान, या स्मार्ट प्रदर्शनात जगभरातील बहुतांशी सर्व देशांनी सहभाग घेतला असून आपल्या देशातील पर्यटन स्थळाची माहिती देऊन जगभरातील पर्यटक, अभ्यासक, व्यवसायिक आदींना आपल्या देशाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जातो.

महाराष्ट्रनेही यंदा या प्रदर्शनात सहभागी होत राज्यातील पर्यटन वैभवाचे द्वार जगभरातील पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांना समोर खुले करून दिले आहेत.

Intro:नाशिकचे नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य, लंडनच्या वर्ल्ड ट्रेड मार्ट प्रदर्शनात झळकले.. लंडन मधील वर्ल्ड ट्रेड मार्ट प्रदर्शनात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग....

Body:इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात आजपासून सुरू झालेल्या वर्ल्ड ट्रेड मार्क प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करून दिले प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटन स्थळाला जगभरातील पर्यटक व्यावसायिकांसह हौशी पर्यटक,पत्रकार, अभ्यासक,अधिकारी आदींनी भेट घेऊन राज्यातील ताडोबा अभयारण्य पासून विविध समुद्रकिनारे किल्ले जंगले आदींची माहिती घेतली ,राज्याच्या पर्यटन सचिव विनिता सिंघल यांनी या सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची त्यांना माहिती करून देत महाराष्ट्राला भेट देण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण देखील त्यांनी दिले, स्मार्ट प्रदर्शनात जगभरातील बहुतांशी सर्व देशांनी सहभाग घेतला आहे,आपल्या देशातील पर्यटन स्थळाची माहिती देऊन जगभरातील पर्यटक ,अभ्यासक, व्यवसायिक आदींना आपल्या देशाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून केला जातो, महाराष्ट्र नेही यंदा सहभागी होत राज्यातील पर्यटन वैभवाचे द्वार जगभरातील पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांना समोर खुले करून दिलेत,आज केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटन स्टॉलचे उद्घाटन करण्यात आलं, राज्याचे पर्यटन सचिव विनिता सिंगल पर्यटन, उपसंचालक रामदास खेडकर आदींनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते, महाराष्ट्र पर्यटनाच्या स्टॉलमध्ये राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गड-किल्ले, अजिंठा-वेरूळ, एलिफंटा आदी विविध ऐतिहासिक गुंफांचे वैभव ,व्याघ्र पर्यटन,समुद्रकिनारे ,जंगले कास, पठारसारखी जगातील वारसास्थळे,तीर्थक्षेत्र ,लोणावळा महाबळेश्वर,चिखलदरा ,माथेरान आणि थंड हवेची ठिकाणे अशा विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शनात करण्यात आली, त्याशिवाय महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव ,खाद्यसंस्कृती, बॉलीवूड चित्रनगरी ,देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यटन वैभव, आदी माहितीही देण्यात आली ,महाराष्ट्र पर्यटनाचा आकर्षक स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, मेरकी कम्युनिकेशन्स यांनी या स्टॉल ची संकल्पना आणि बांधणी केली आहे.... टीप फीड ftp nsk tourism exhibition viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.