ETV Bharat / state

कॅन्सर जनजागृतीसाठी नाशकात महिलांची पिंक बाईक रॅली

author img

By

Published : Oct 4, 2020, 4:15 PM IST

स्तन कँसरबाबत जनजागृतीसाठी नाशिकमध्ये एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, वाव ग्रुपच्या वतीने पिंक थीम घेऊन महिला बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करत महिला ह्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

नाशकात महिलांची पिंक बाईक रॅली
नाशकात महिलांची पिंक बाईक रॅली

नाशिक - कॅन्सरबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी नाशिकमध्ये बी फ्रेंड कॅन्सर अंतर्गत जनजागृतीसाठी नाशिकमध्ये महिलांची पिंक बाईक रॅली काढण्यात आली होती. योग्य उपचार आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो, हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कॅन्सरबाबत आपला अनुभव सांगितला.

कॅन्सरबाबत प्रतिक्रिया देताना अभिनेत्री मनीषा कोईराला

ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पळाला जातो. भारताच्या ग्रामीण भागातील 32 महिलांमागे एका महिलेला तर शहरी भागातील 8 महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे. ह्याच अनुषंगाने बी फ्रेंड कर्करोग ह्या संकल्पनेअंतर्गत कर्करोग रुग्ण आणि जे रुग्ण ह्या परिस्थितीमधून बरे झाले आहेत ते एकमेकांसोबत बोलून आपल्या समस्या आणि भीतीचे निराकरण करू शकणार आहेत. अशा प्रकारचा हा भारतातील पहिला उपक्रम असून कर्करोग जनजागृतीसाठी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, वाव ग्रुपच्या वतीने पिंक थीम घेऊन महिला बाईक रॅली काढण्यात आली. ह्यावेळी कोरोनाच्या काळात सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा वापर करत महिला ह्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

कॅन्सरने मला खूप काही शिकवलं - अभिनेत्री मनीषा कोईराला

मला लास्ट स्टेजचा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर धक्का बसला होता. मात्र मी न डगमगता याचा सामना करायचे ठरवले. मी न्यूयॉर्कमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू केली, तेव्हा तेथील डॉक्टरांनी माझ्यावर योग्य उपचार करून चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले. पण त्याच बरोबर माझ्या कुटुंबानी आणि मित्र परिवाराने मला मानसिक आधार दिला. त्यामुळे मी ह्या आजारातून बाहेर येऊ शकले. ह्या काळात मी माझी लाईफस्टाइल चेंज केली. व्यायाम, शुद्ध शाकाहारी संतुलित पोषक आहार घेण्यास सुरुवात केली. त्यासोबत मी रोज प्राणायाम आणि ध्यान करून स्वतःची मानसिकता सकारात्मक ठेऊ शकल्याचे अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित महिलांना सांगितले. आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा, चांगले कुटुंब, मित्रपरिवार असेल तर आपण कॅन्सरवर मात करून चांगले आयुष्य जगू शकतो असे कोईराला यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाला आयपीएस अधिकारी रवींद्र सिंघल, मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर, प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ राज नगरकर, डॉ. विरेन नगरकर, अश्विनी न्याहारकर, विद्या मुळाने, रेखा देवरे, ललित सासले, किरण भालेराव आदि उपस्थित होते.

हेही वाचा - येवल्यात अंकाई बारीत सराफास लुटणाऱ्या 5 चोरट्यांना 24 तासात अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.