ETV Bharat / state

धक्कादायक! बहिणीच्या मृतदेहाजवळ ती होती 11 दिवस बसून..

भगूरमधील विजयनगर परिसरातील पंचमोती सोसायटीत राहणाऱ्या दोन बहिणींपैकी सविता दिगंबर बागुल (वय 42) हिचा 11 दिवसांपूर्वी घरात मृत्यू झाला होता. मात्र ही बाब तिची बहीण मीना दिगंबर बागुल (वय 44) हिने कोणालाही सांगितली नाही. मीना तब्बल 11 दिवस सविताच्या मृतदेहासोबत राहत असल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! बहिणीच्या मृतदेहाजवळ ती होती 11 दिवस बसून..
author img

By

Published : Nov 1, 2019, 12:39 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील भगूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका घरात बहिणीच्या मृतदेहाजवळ तिची बहीण तब्बल 11 दिवस राहत असल्याचे उघड झाले आहे. मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्यामुळे ही बाब समोर आली. सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वरून पोलिसांनी घराची झडती घेतली असता हा प्रकार समोर आला. घरात राहणाऱ्या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या, आदित्य ठाकरेंची राज्यपालांना विनंती

भगूरमधील विजयनगर परिसरातील पंचमोती सोसायटीत राहणाऱ्या दोन बहिणींपैकी सविता दिगंबर बागुल (वय 42) हिचा 11 दिवसांपूर्वी घरात मृत्यू झाला होता. मात्र ही बाब तिची बहीण मीना दिगंबर बागुल (वय 44) हिने कोणालाही सांगितली नाही. मीना तब्बल 11 दिवस सविताच्या मृतदेहासोबत राहत असल्याचे समोर आले आहे. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे सोयासायटीत राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी घराची झडती घेतली असता हा प्रकार समोर आला.

सविताचा मृतदेह कुजला असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घरातच तिचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतरच सविताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. संबंधित दोन्ही बहिणी मनोरुग्ण असून त्या दोघीच ह्या घरात राहत असल्याचे म्हणणे आहे. ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी सोसायटीमध्ये मोठी गर्दी केली होती.

Intro:धक्कादायक :बहिणीच्या मृतदेहाजवळ ती अकरा दिवस होती बसून..

Body:नाशिकच्या भगूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे...घरात बहिणीच्या मृत्यू नंतर तिच्या मृतदेहाजवळ तिची बहीण तब्बल 11 दिवस राहत असल्याचं उघड झालं आहे..मृतदेह कुजल्या नंतर त्या दुर्गंधी मुळे ही बाब समोर आली असून सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वरून पोलिसांनी घराची झडती घेतली असता हा प्रकार समोर आला..घरात राहणाऱ्या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे...

नाशिकच्या भगूर गावातील विजयनगर परिसरातील पंचमोती सोसायटीत राहणाऱ्या दोन बहिणींपैकी सविता दिगंबर बागुल वय 42 हिचा 11 दिवसापूर्वी घरात मृत्यू झाला होता,मात्र ही बाब
बहीण मीना दिगंबर बागुल वय 44 हिने कोणालानं सांगता तब्बल 11 दिवस ती सविताच्या मृतदेहा सोबत राहत असल्याचं समोर आलं आहे..घरातून दुर्गंधी येत असल्याने सोयासायटी मधील नागरीकांनी पोलिसांत तक्रार दिली,ह्यावरून पोलिसांनी ह्या घराची झडती घेतली असता हा प्रकार समोर आला आहे..सविताचा मृतदेह कुजला असल्याने जिल्ह्या शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घरातच तिचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला असून ह्या नंतर सविताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे..ह्या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असून त्या दोघीच ह्या घरात राहत असल्याचे म्हणणं आहे..ही घटना समजताच आजूबाजूच्या नागरीकांनी सोसायटी परिसरात मोठी गर्दी केली आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.