नाशिक : सोशल मीडियावर फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये अनेकदा महिला बळी पडताना दिसत असल्याच्या घटना समोर आली आहे. नाशिकच्या एका महिलेचा संसार मोडल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीला सोशल मीडियावर अनोखी व्यक्तीसोबत केलेली मैत्री चांगलीच महागात पडली. ( Nashik Crime )
काय आहे प्रकरण : किरकोळ वादातून पती पासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने फेसबुकवर दिल्ली येथील रोहित करण सिंग पांचाल या अनोळखी व्यक्तीशी मैत्री केली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान प्रेमात असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली आणि संशयित व्यक्ती हा अनेकदा नाशिकला येऊन या महिलेला भेटला. त्याने नकळत मोबाईलमध्ये महिलेचे अश्लील फोटो व्हिडिओ काढून ठेवले होते. काही दिवसांनी कुटुंबाच्या मदतीने पती-पत्नी पुन्हा एकत्र येण्यास तयार झाले. त्यामुळे विवाहितेने त्या मित्राला भेटण्यास नकार दिला. याचा राग मनात येऊन त्या संशयिताने दोघांचे खाजगी फोटो तिच्या पतीला आणि तिच्या नातेवाईकांना पाठवल्याने ( Due to pornographic videos ) त्यामुळे या विवाहितेचा जोडणारा संसार परत मोडला. या महिलेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सोशल मीडिया वापरताना सावधान : सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जे व्यक्तींना आपण वैयक्तिक ओळखत नाही, अशा व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. तसेच आपले व्हिडीओ, फोटो टाकू नये यातून आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते, असे सायबर तज्ञांनी सांगितले.